मुर्तिजापूर राष्ट्रवादी युवक काँगेसच्या शहर अध्यक्षपदी शुभम चंद्रखेशर मोहोड मुर्तिजापूर
X
म मराठी न्यूज टीम
मुर्तिजापुर तालुका प्रतिनिधी / अकोला :- भुषण महाजन दि. 03/11/2020
अकोला येथे दि. 22/10/2020 रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेसची बैठक आयोजीत करण्यात आली होती. त्या बैठकीमध्ये मुर्तिजापूर शहरातील माजी सभापती सौ. सिंधुताई दामोदर मोहोड यांचे नातु तसेच मुर्तिजापूर शहराच्या माजी न.प. सभापती सौ. पुष्पाताई चंद्रेशखर मोहोड यांचे चिरंजीव शुभम मोहोड हे अनेक वर्षापासुन राष्ट्रवादी काँग्रेसशी जुळले असुन त्यांची आई सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका होत्या. शुभम चंद्रेशखर मोहोड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक वर्षापासुन कार्यकर्ते म्हणुन काम करत होते. त्यांनी मुर्तिजापूर शहर व ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकरीता, युवकांकरीता व बेरोजगारांकरीता अनेक आंदोलने, विविध संघटनेच्या माध्यमातुन रक्तदान शिबीर व इतर लोकोपयोगी कार्य केले असुन त्यांच्या कार्याची दखल अकोल्या जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्रामभैय्या गावंडे व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवाभाऊ मोहोड यांनी घेतली असुन त्यांनी शुभम चंद्रेशखर मोहोड यांची मुर्तिजापूर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शहर अध्यक्षपदी निवड केली असुन शुभम मोहोड यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करतांना मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांचे आदर्श डोळयांसमोर ठेऊन पक्षाचे काम करेल. सर्व युवकांना सोबत घेवुन शेतकऱ्यांच्या/व्यापाऱ्यांच्या/इतर नागरीकांच्या समस्या सोडविण्याचे काम करेल. असे मनोगत शुभम मोहोड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस युवक मुर्तिजापूरच्या शहर अध्यक्षपदी निवड झाल्यावर व्यक्त केली. त्यांचे निवडीचे श्रेय मुर्तिजापूर शहर व ग्रामीण भागातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व जेष्ठ नेते, ग्रामीण व शहराचे पदाधिकारी व इतर कार्यकर्त्यांना देत आहे. अशी माहिती – राष्ट्रवादी काँगेस युवक काँग्रेसचे मुर्तिजापुर शहराचे प्रसिध्दी प्रमुख प्रतिक किशोर नागरिक यांनी दिली.
प्रतिनिधी – भुषण महाजन मो. 9850024474 / 9156273113