मुर्तिजापुर शहरामध्ये अकोला पॅटर्न सुरु करण्यात यावा...
X
म मराठी न्यूज टीम
प्रतिनिधी/भुषण महाजन
मूर्तिजापुर,दी.१८ : अकोला शहरामध्ये संतोषी माता मंदिरा समोरील भाजी मंडी मध्ये रस्तयांवर उभ्या राहणाऱ्या हातगाडया लावल्या जातात. त्यामुळे रस्तयावरच्या वाहतुकीला या गाडयांचा अडथळा होत नाही. अशाच स्वरुपाचा अकोला पॅटर्न मुर्तिजापुर शहरामध्ये सुरु करण्यात यावा. सलग 3 वर्षापासून सुरु असलेलया मुख्य रस्तयाच्या कामामुळे व वाढत्या वाहतुकीमुळे शहरामध्ये मुख्य रस्तयांबरोबरच आतील रस्त्ंयावर सुध्दा रस्त्यांच्या रुंदी मध्ये कमीपणा आला आहे. रस्तयांवर हातगाडया उभ्या करुन आपला उदरनिर्वाह करणाऱ्यांना दिवसभरात आपल्या गाडया इकडून – तिकडे, तिकडून – इकडे सरकाव्या लागतात. या हातगाडयावाल्यांना कधी दुकानदारांचा त्रास, कधी जड वाहनांचा त्रास तर कधी रस्तयावरुन ये-जा करणाऱ्या वाहनांचा त्रास. त्यांच्या या परिस्थितीमुळे शहरामध्ये वाहनधारक,, दुकानदार व त्यांच्यामध्ये वादविवादाचे प्रसंग उदभवतात. याला सर्वस्वी कारणीभुत असणाऱ्या नगर पालिका प्रशासनाला या समस्येकडे लक्ष दयायला वेळ नाही. पोलीस खात्यावर असलेल्या जबाबदारींवर अशा या परिस्थितीचा फुकटचा त्रास होतो. याचा फायदा फक्त राजकारणी व समाजसेवक आपले मोठेपण जपण्याकरिता करतात. नगर पालिका प्रशासनाला व पोलीस विभागाला आपले काम करण्याकरिता रोखतात.
शहराच्या मध्यभागी असणाऱ्या व प्रसिध्द अशा आठवडी बाजारांमध्ये शहरातील हातगाडंयावर भाजीपाला, फळे, कपडे व इतर व्यवसाय करुन आपला उदरनिर्वाह चालविणाऱ्या हातगाडया हलविण्यात याव्या. बाजारामध्ये दोन चाकी वाहन धारकांना आपले वाहने ठेवायला सुध्दा मोठया प्रमाणात जागा आहे. यामुळे तेथे लागणाऱ्या दुकानांमुळे बाजाराची सुध्दा स्वच्छता राखल्या जाईल तसेच रस्तयांवर होणारी वाहतकुीची कोंडी होणार नाही. तसेच बाजारा मध्ये लावण्यात आलेल्या लाईटमुळे रात्री सुध्दा आपला व्यवसाय करता येईल.