मुर्तिजापुर शहराच्या विकास कामाला लागला पूर्ण विराम राठी मार्बलच्या लगतच्या रस्त्याची दुरावस्था !
X
म मराठी न्यूज टीम
प्रतिनिधी/भुषण महाजन
मुर्तिजापुर,दि.१८ शहरातील प्रसिध्द असलेल्या राठी मार्बल बाजूच्या रस्तयाची दुरावस्था झालेली आहे. रस्तयांवर पडलेल्या खडडयांमुळे पाऊस आल्यावर येथे पाणी साचते. या पाण्यामुळे येणाऱ्या – जाणाऱ्या पादचाऱ्यांबरोबरच वाहन धारकांना सुध्दा त्रास होतो. याच रस्तयावर पुढे रुगणालय, प्रसुती गृहे आहेत. रात्री – अपरात्री गरोदर महिलेला जर न्यावयाचे असल्यास वाहनधारकांना तथा नातेवाईकांना फेरा करुन दूरच्या रस्तयाने रुग्णालयात न्यावे लागते. याच रस्तयावरुन शाळां मध्ये मुलांना सोडण्याकरिता पालक, रिक्षा चालक जातात. लहान मुलांना नेतांना – आणतांना वाहने हेलकावे घेवून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशातच तेथे भर पडते ड्रॉयव्हिग शाळा, एटीएम होणाऱ्या गर्दीची.
या प्रभागातील लोकप्रतिनिधी तथा संबंधित या रस्तयाच्या दुरावस्थेकडे लक्ष का देत नाही ? असा प्रश्न सामान्य जनतेला पडला असून आता तरी या रस्तयाचे काम त्वरीत करावे. परिसरातील दानशुर समाजसेवक रवि राठी यांनी या रस्तयाच्या दुरावस्था बाबत गंभीर पावले उचलावीत. अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली.