मुर्तिजापुर तहसीलदार व पुरवठा निरीक्षण अधिकारी विना परवानगी राहतात गैरहजर मनमौजी अधिकाऱ्यांमुळे सामान्य जनतेला घ्यावे लागते हेलपाटे – राजेंद्र मोहोड
X
म मराठी न्यूज टीम
मुर्तिजापुर तालुका प्रतिनिधी / अकोला :- भुषण महाजन दि. 17/11/2020
विना परवानगी गैरहजर असलेल्या तहसीलदार व पुरवठा अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात दिरंगाई का ? – राजेंद्र मोहोड
अधिकाऱ्यांच्या मनमौजी धोरणाला कधी लगाम लागेल ? हा प्रश्न कधीही न सुटणारा आहे. अकोला जिल्हयातील मुर्तिजापुर शहर तसे पाहता या बाबतीत प्रसिध्द आहे. महाराष्ट्रासह अकोला जिल्ह्यामध्ये तसेच मुर्तिजापूर तालुक्यामध्ये कोरोना महामारीचे संकट असतांना आणि दिवाळीचा सण सुरु असतांना सुध्दा तहसीलदार प्रदिप पवार हे दि. 13/11/2020 पासुन विना परवानगी मुख्यालयी गैरहजर आहेत. या अगोदर सुद्धा अशाचप्रकारे विना परवानगी मुख्यालयी गैरहजर होते. तसेच पुरवठा निरिक्षण अधिकारी हे सुद्धा विना परवानगी मुख्यालयी गैरहजर असुन या संदर्भात अनेक तक्रारी आपल्या कार्यालयाला दिल्या आहेत. अशा प्रकारे विना परवानगी गैरहजर राहणाऱ्या मुर्तिजापूर येथील तहसिलदार प्रदिप पवार आणि पुरवठा निरिक्षण अधिकारी यांच्यावर शिस्तभंग निलंबनाची कारवाई करण्याबाबत सामाजिक कार्यकर्ता राजेंद्र दामोदर मोहोड यांनी राज्याचे महसुल राज्यमंत्री मा. अब्दुलजी सत्तार साहेब यांना निवेदन दिले आहे.
मुर्तिजापूर तहसिल कार्यालयातील पुरवठा विभाग हा दि. 12/11/2020 पासुन विना परवानगी बंद असल्यामुळे नागरीकांना त्यांच्या कामाकरीता अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. याला जबाबदार कार्यालयीन प्रमुख तहसिलदार पवार आणि पुरवठा निरिक्षण अधिकारी हे आहेत. सणा -सुदीच्या काळात कार्डधारकांना वेळेवर धान्य वाटप होते किंवा नाही यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी खेडोपाडी दौरे करावयाला पाहीजे. त्यासाठी त्यांना शासकीय वाहन शासनाने दिले आहे. परंतु या वाहनांचा उपयोग फकत खाजगी कामासाठी सरकारी वाहनांचा वापर होतो. तहसीलदारासह कार्यालयातील एकही अधिकारी दिवाळी सणाच्या काळात मुख्यालयी हजर नाही. याकडे जिल्हाधिकारी साहेब / उपविभागीय अधिकारी साहेब यांचे अजीबात लक्ष नाही. शासकीय बंगला केवळ कोतवालाकरीता ठेवला आहे का ? जर अधिकारी बंगल्यात कुटूंबासह राहत नाही तर ते बंगले कशासाठी आहेत ? इकडे सामान्य जनतेला आपल्या घराचे घरपण राखण्याकरिता जीवाचे रान करावे लागते. तर इकडे या अधिकाऱ्यांना शासनाकडून पुरविण्यात येणाऱ्या सुविधांचा गैर फायदा घेतला जातो. त्यामुळे यांचा घरभाडे भत्ता तात्काळ बंद करण्यात यावा. शासकीय निवासस्थान असतांना दररोज तहसीलदार अमरावतीवरुन कसे काय येणे - जाणे करतात. ते कुटूंबासह मुर्तिजापूरला का राहत नाही ? असे अनेकाविविध प्रश्न निर्माण होतात. परंतू यांच्या या प्रकरणावर वरिष्ठ अधिकारी पडदा का टाकतात ? कोण जाणे.
सध्या राज्यात कोरोना महामारीचे संकट असून, दिवाळी सणाच्या काळात कायदा सुव्यवस्था लागू असतांना ह्या दोन्ही जबाबदाऱ्या टाळून नायब तहसिलदार / तहसिलदार / पुरवठा निरिक्षण अधिकारी व इतर कर्मचारी गायब आहेत. जर कधीही अनुचित प्रकार घडल्यास याला जबाबदार कोण आहे ? ह्या कायदेशीर बाबी अधिकाऱ्यांना समजत नाहीत काय ?
कोरोना काळात व दिवाळी सणाच्या काळात कायदा सुव्यवस्था राखण्याकरीता तहसिलदार यांनी स्वतःची जबाबदारी पार न पाडता मुख्यालयी गैरहजर आहेत. त्याचप्रमाणे कार्यालयाचे कामकाजाचे दिवशी कोरोनाचे कारण पुढे करुन मेन गेटला कुलूप लावुन बंद ठेवण्यात येते व सुटीचे दिवशी मात्र गेट पुर्णपणे उघडे असते. कार्यालयाचा परिसर कोणाच्या भरवशावर असतो हेच समजत नाही . बंगला बंद असतांना तेथे २/३ कोतवाल ठेवुन कार्यालयावर कोणाचीच नेमणुक केलेली नसते . त्यामुळे शासकिय / सार्वजनिक मालमत्ता रामभरोसे असते. यापुर्वी तहसिल परिसरामध्ये चोरीचे प्रकार घडले आहेत. कदाचित पुन्हा असा प्रकार घडल्यास यांस जबाबदार कार्यालयीन प्रमुख तहसिलदार प्रदिप पवार हे राहतील. बार्शिटाकळी तहसिल जि . अकोला येथे अभिलेख कक्षाला आग लागून नागरीकांचे व महसुल विभागाचे महत्वाची कागदपत्रे जळाली होती. आज त्याचा परिणाम बार्शिटाकळी तालुक्यातील जनता भोगत आहे. त्या आगीची झळ फक्त सामान्य जनतेला सोसावी लागते. यांना यांचा 30 दिवसांचा महिना संपला की, आपल्या खात्यात येणाऱ्या पगाराशी घेणे – देणे आहे. सामान्य जनता मरो की जगो काही फरक नाही.
अशा प्रकारे सामान्य जनतेची, वरिष्ठ अधिकाऱ्यांची व शासनाची दिशाभुल करणाऱ्या मनमौजी तहसिलदार प्रदिप पवार / पुरवठा निरिक्षण अधिकारी यांच्या शिस्तभंगाची / निलंबनाची कारवाई करण्यात यावी. अशा स्वरुपाचे निवेदन दिलेले असून त्यांच्या प्रतिलिपी मा. बच्चुभाऊ कडु, पालकमंत्री, अकोला जिल्हा, मा, विभागीय आयुक्त साहेब, अमरावती विभाग, मा. जिल्हाधिकारी साहेब, अकोला, मा. उपविभागीय अधिकारी, मुर्तिजापूर यांना दिल्या आहेत. तहसिलदार यांचे शासकीय निवासस्थान बंद असतांना आणि पुरवठा विभाग विना परवागनी बंद ठेवले असतांना आणि कार्यालयाचे मुख्य प्रवेशदार बंद व सुरु ठेवले असतांनाची फोटोची छायांकीत प्रत व हिडीओ शुटींगसह पाठविण्यात आलेल्या आहेत. अशी माहिती सामाजिक कार्यकर्ता राजेंद्र मोहोड यांनी दिली.