मुर्तिजापुर उपजिल्हा रुग्णालय बनले रेफर टू अकोलाचे सेंटर
X
मुर्तिजापुर प्रतिनिधी (भुषण महाजन) :- प्रत्येक डॉक्टरांचे कर्तव्य असतो की आलेल्या रुग्णांना योग्य उपचार मिळावा परंतु यामध्ये भेद भाव दिसून येत आहे आपली जबाबदारी प्रामाणिकतेने न करता मुर्तीजापुर मध्ये मनमानी कारभार प मागील अनेक वर्षापासून सुरू असुन असलेली परंपरा कायम असतांना मुर्तिजापुर उपजिल्हा रुग्णालय बनले रेफर टू अकोलाचे सेंटर हे रुग्णांसाठी व नातेवाईकांसाठी डोकेदुखी ठरले आहे.
स्वर्गीय लक्ष्मीबाई देशमुख यांनी गोरगरिबांना योग्य उपचार मिळावा त्यांना कोणताही त्रास होऊ नये याकरिता त्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जमीन या रूग्णालयाला उपलब्ध करून दिली परंतु या ठिकाणी असलेल्या वैद्यकीय अधीक्षक यांचा मनमानी कारभारने तालुक्यातील समस्त रुग्ण वैतागले आहे व अनेक तक्रार सुद्धा ते तोंडी करत आहे परंतु त्यांची तक्रार ऐकण्यासाठी कोणी तयार नाही दीन दुखी गरिब रुग्णांचा वाली कोण असाही प्रश्न याठिकाणी निर्माण होतो. मुर्तिजापुर तालुक्यामध्ये एकूण 164 खेडे गांवाचा समावेश आहे . या सर्व गावातील गोरगरीब जनता उपजिल्हा रुग्णालय, मुर्तिजापुर येथे उपचारा करिता येतात. कठीण परिस्थिती असते दिवस पूर्ण झालेल्या गरोदर महिलांकरिता तर जीव धोक्यातच घालून सरकारी दवाखान्या मध्ये यावे लागते. उपजिल्हा रुग्णालया मध्ये मार्च 2020 ते ऑगस्ट 2020 महिन्या पर्यंत एकूण 505 महिला बाळतंपणाकरिता आल्या होत्या. त्यामधून मार्च महिन्यात 108 महिलांपैकी 66 महिलांची नॉर्मल बाळतंपण, 7 महिलांची सिझर झाले.
तसेच 30 महिलांना रेफर करण्यात आले. एप्रिल महिन्यात 87 महिलांपैकी 39 महिलांची नॉर्मल बाळतंपण, 4 महिलांची सिझर झाले. तसेच 43 महिलांना रेफर करण्यात आले. मे महिन्यात 84 महिलांपैकी 37 महिलांची नॉर्मल बाळतंपण, 2 महिलांची सिझर झाले. तसेच 38 महिलांना रेफर करण्यात आले. जुन महिन्यात 55 महिलांपैकी 31 महिलांची नॉर्मल बाळतंपण, 6 महिलांची सिझर झाले. तसेच 26 महिलांना रेफर करण्यात आले. जुलै महिन्यात 85 महिलांपैकी 37 महिलांची नॉर्मल बाळतंपण,9 महिलांची सिझर झाले. तसेच 29 महिलांना रेफर करण्यात आले. ऑगस्ट मे महिन्यात 74 महिलांपैकी 35 महिलांची नॉर्मल बाळतंपण, 5 महिलांची सिझर झाले. तसेच 37 महिलांना रेफर करण्यात आले. तसेच येणाऱ्या महिना म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये 12 महिलांपैकी 03 महिलांची नॉर्मल बाळतंपण, 02 महिलांची सिझर झाले. तसेच 04 महिलांना रेफर करण्यात आले.
अशाप्रकारे आज पर्यंत उपजिल्हा रुग्णालयामध्ये एकूण 507 गर्भवती महिला बाळतंपणाकरिता दाखल झाल्या त्यातून 207 गर्भवती महिलांना रेफर करण्यात आल्या. याचा अर्थ 40 टक्के गर्भवती महिलांना रेफर करण्यात येते. एवढा मोठा तालुका व उपजिल्हा रुग्णालय असून सुध्दा येथे व्यवस्था नाही. ही खेदाची बाब आहे. तीन दिवसा अगोदर अशाच रेफर केलेल्या गर्भवती महिलेचा मृत्यु झाला आहे. वेळेवर तिला जर उपचार मिळाला असता तर ती वाचू शकली असती. अशीच परिस्थिती इतर रुग्णांना बाबत आहे. अपघातग्रस्त व इतर रुग्णांबाबत ही अशीच परिस्थिती आहे. रुग्ण जर जास्त सिरियस असला तर रेफर करण्यात येते. येथे असलेल्या अपुऱ्या सुविधांबाबत जिल्हा प्रशासनाला अंधारात ठेवण्याचे काम येथील वैदयकीय अधिक्षकाने केली. शासन गोरगरीबां करिता किती खर्च करुन आरोग्य सेवा चांगल्या रितीने पुरविण्याचा प्रयत्न करते. परंतू प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे किती जणांना आपला जीव गमाववा लागला आहे. या सर्व प्रकरणाकडे लक्ष देवून स्थानिक व जिल्हा प्रशासनाने उपजिल्हा रुगणालया मध्ये सर्व सुविधा उपलब्ध करुन दयाव्या अशी मागणी सर्वसामान्य जनतेने कडून होत आहे.
भुषण महाजन मो.नं. – 9850024474 / 9156273113