मुनघाटे महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन साजरा
X
दिवाकर भोयर म-मराठी न्यूज धानोरा प्रतिनिधी 9421660523
स्थानिक धानोरा येथील श्री जीवनावर सीताराम पाटील मुनघाटे महाविद्यालयात निरंतर प्रोढ शिक्षण व विस्तार विभाग व रासेयो विभागातर्फे आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विणा जंबेवार मॅडम होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ गणेश चुदरी, डॉ पंढरी वाघ डॉ राजू किरमीरे डॉ सोनाली ढवस आदी मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवसावर प्रकाश टाकला. अध्यक्षीय भाषणातून आंतरराष्ट्रीय स्तरावर साक्षरता दिनाची सुरुवात कशी झाली याबद्दल माहिती दिली.कार्यक्रमाचे संचालन प्रा ज्ञानेश बनसोड यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ प्रियंका पठाडे मॅडम यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ दामोदर झाडे, प्रा संजय मुरकुटे, प्रा मांतेश तोंडरे,प्रा. नितेश पुण्यप्रेड्डीवार, डॉ सचिन धवनकर,प्रा. गीताचंद्रन भैसारे मॅडम आणि प्रा. प्रविण गोहणे प्रा भाविकदास करमनकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम यशस्वी करण्यात आला.