Home > विदर्भ > मुडाणा वीज उपकेंद्रामुळे १८ गावांना अंधाराचा सामना

मुडाणा वीज उपकेंद्रामुळे १८ गावांना अंधाराचा सामना

मुडाणा वीज उपकेंद्रामुळे १८ गावांना अंधाराचा सामना

अघोषित भारनियमन : तीन हजार शेतकऱ्यांचे रब्बी पिकांचे सिंचन आले धोक्यात.

मुडाणा प्रतिनिधी/ शरद गोभे

यवतमाळ/महागाव : मुडाणा येथील 33 केव्ही विज उपकेंद्राच्या गलथान कारभारामुळे १८ गावातील शेतकऱ्यांना अंधाराचा ज्याच सहन करावा लागत आहे त्या सोबत सुमारे तीन हजार शेतकऱ्यांची रब्बी हंगामातील पीक धोक्यात येण्याची दाट शक्यता आहे .येथील रोहित्र वारंवार जळण्याच्या घटना घडत आहे शिवाय वीज पुरवठा सुरू असला तरी वीज कमी दाबाने होत असल्यामुळे शेतकरी हैराण झाले आहे .संबंधित विभागासह परिसरातील लोकप्रतिनिधी या प्रश्नावर पुढाकार घ्यावा अशी मागणी होत आहे . या उपकेंद्रावर सातत्याने अघोषित भारनियमन केले जात आहे शेतकऱ्यांना सतत अडचणीचा सामना करावा लागत आहे शेतकऱ्यांच्या नजरा आता रब्बी हंगामाकडे लागल्या आहेत .खरीप हंगामात आलेली घट भरून काढण्यासाठी शेतकर्‍यांच्या आशा रब्बी वर लागल्या आहेत मात्र शेतशिवारात पाणी असूनही वीज पुरवठा नसल्याने सिंचन करण्याची समस्या निर्माण होत आहे वीज वितरण कडे विचारणा केली असता अधिकारी-कर्मचारी उडवाउडवीची उत्तरे देत आहे एक महिन्यापासून ट्रांसफार्मर जळाले आहे कंपनीकडे पाठवली आहे असे सांगून वेळ मारून नेत आहेत एका ट्रांसफार्मर व १८ गावांचा लोड दिल्यामुळे समस्या उद्भभवत आहे साधूनगर ,तांडा, हिंगणी , धारमोहा, धारेगाव, शेनंद, लोहारा ,टेंभुरधरा ,नेहरूनगर, बिजोरा ,घाणमुख, दगडथर, राजुरा, बिजोरा, नांदगाव ,तेलंगवाडी आदी गावांमध्ये शेतकरी त्रस्त आहे . १५ दिवसात समस्या न सुटल्यास आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना तालुकाप्रमुख प्रमोद भरवाडे यांनी दिला आहे .

Updated : 11 Nov 2020 3:54 PM GMT
Next Story
Share it
Top