Home > विदर्भ > मुडाणा येथे कॉंक्रेट रोड व नालीचे निकृष्ट दर्जाचे बांधकाम

मुडाणा येथे कॉंक्रेट रोड व नालीचे निकृष्ट दर्जाचे बांधकाम

मुडाणा येथे कॉंक्रेट रोड व नालीचे निकृष्ट दर्जाचे बांधकाम
X

मुडाणा येथे कॉंक्रेट रोड व नालीचे निकृष्ट दर्जाचे बांधकाम

(महागांव प्रतिनिधी/शरद गोभे)

यवतमाळ/महागाव :- शासनाच्या निधीतून तालुक्यातील मुडाणा ग्रामपंचायत दलित वस्ती येथे रोड व नाली चे बांधकाम काही दिवसा अगोदर करण्यात आले आहे . कोरोनामुळे निधी परत जाण्याचा भितीने थातुर-मातुर निकृष्ट दर्जाचे रोड व नालीचे बांधकाम करण्यात आले आहे.

यावरून दलित वस्ती सुधार योजने मार्फत गावात केलेले नाली व रस्त्याचे बांधकामाला अधिकाऱ्यांचे गालबोट लागल्याचे दिसून येते. एखादे बांधकाम म्हटले की, अधिकारी आणि पदाधिकारी यांची टक्केवारी ठरलेली असते. त्यामुळे तक्रार करावी कोणाकडे आणि केली तरी त्याचे निराकरण होत नाही. निधी परत जाऊ नये. तसेच कामे केली नाही तर कमाई आणि कमीशन मिळणार नाही या नादात नाली बांधकामाचा सपाटा लावण्यात आला.

याची चौकशी केल्यास पितळ उघडं पडेल व अधिक मलिंदा लाटण्याच्या नादात विकासाच्या नावाखाली बोगस कामे करण्यात आली आहे. तरी सदर कामाची चौकशी करुन दोषीवर कारवाई करावी अशी मांगणी गावकऱ्यांनी गटविकास अधिकारी यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे .

Updated : 23 Oct 2020 4:07 AM GMT
Next Story
Share it
Top