Home > महाराष्ट्र राज्य > मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर कारवाईची मागणी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर कारवाईची मागणी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर कारवाईची मागणी
X

वाडा:प्रतिनिधी

संजय लांडगे

शिवसेनेचे पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बद्दल सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट आज वाडा शहरातील शिवसैनिकांच्या वाचनात आल्या नंतर त्याची गंभीर दखल घेऊन अशा पोस्ट करणाऱ्याविरोधात कारवाई करण्या संदर्भात पत्र वाडा पोलीस स्टेशन व वाडा तहसिलदार यांना देऊन अशा आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.

व्हाट्सअँप व फेसबुक सारख्या प्रसिद्धी माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांंच्या बाबत बदनामी कारक पोस्ट टाकणाऱ्यांवर पोलीस विभागाच्या सायबर सेलच्या वतीने गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी वाड्यातील शिवसैनिकांनी केली आहे.या भरत गायकवाड, तेजस गंधे, सुनील भानुशाली, निलेश पाटील,पुष्कर पाटील,अलकनंदा भानुशाली,मनाली पाटील,मुकेश चव्हाण आदी उपस्थित होते.

Updated : 10 Sep 2020 3:56 PM GMT
Next Story
Share it
Top