Home > महाराष्ट्र राज्य > मुंबईची नाईट लाईफ, थंडावली.

मुंबईची नाईट लाईफ, थंडावली.

मुंबईची नाईट लाईफ, थंडावली.
X

लेखक, श्री. तानाजी सखाराम कांबळे.

.........................................................

मुंबई, दि.1,ऑगस्ट.

..........................................................

देशाच्या बाजारपेठेतील सत्ता आकर्षणाचे केंद्र असलेल्या राजधानी मुंबई येथील, नाईट लाईफ सध्या थंडावली आहे.

मुंबईला महाराष्ट्राची आर्थिक राजधानी म्हणून ओळखले जाते.

मुंबई, बॉम्बे, म्हमई, मुंबईचा बाब्या, सरकारी बाबू, आणि चित्रपटातील रात्रीचे झगमगाट करणारी चंदेरी दुनिया, मुंबईकर यांचेसह महाराष्ट्राचे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरणारी आहे.

मुंबई शहरातील डोळे दिपवणारा उंच उंच इमारती,चोहे बाजूने शहराला असलेला समुद्राचा विळखा, समुद्राच्या पाण्याच्या वरून उभारलेली उंचच्या उंच, वाहतुकीचे पर्यायी व्यवस्था, श्रीमंताला भिकारी करणारी तर भिकाऱ्याला अतिश्रीमंत करणारी ही मुंबई, अनेकांची जीवनदायिनी बनली आहे.

कधीकाळी गिरण्यांच्या भोंग्याचा सोसाट आवाज, व त्या आवाजाचा गोंगाट करणारी चिमणी बंद झाल्याने, मुंबईतल्या गिरणी कामगारांच्या आयुष्यात कायमचे लॉकडाऊन झाले.

जगभरामध्ये कोरोना सारख्या जागतिक महामारी ने, देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळख असणाऱ्या मुंबईसारख्या ठिकाणी, कोरुं आणि अति प्रचंड शिरकाव केल्याने, मुंबई येथील 24 तास चालणारी लाइफ लाईन, थंड पडलीच, पण सर्वाधिक आकर्षण असणाऱ्या मुंबईची, नाईट लाइफ थंड झाल्याने, या झगमगाटा पाठीमागच अर्थकारण देखील थंडावला आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथे, महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालय अर्थात, कायदेमंडळाचे, तसेच मंत्रालय असल्याने, केंद्र व राज्य सरकारच्या अखत्यारीत असणारे मुख्यालय या ठिकाणी आपले अनेक पिढ्या ठाण मांडून बसलेले आहेत. मात्र इथल्या अर्थकारणाशी निगडित असणारा महत्त्वाचा घटक, पर्यटनाचा मानला जातो. मुंबईच्या नाईट लाईफ शी, त्याचा थेट संबंध जोडला जातो.मात्र या ठिकाणची नाईट लाईफ थंडावल्याने,या ठिकाणी फक्त नीरव शांतता पाहायला मिळते. पोलिसांच्या संरक्षणात बंदिस्त असलेल्या, नाईट शिफ्ट मधील ड्युटी वगळता, कोरोणा सारख्या महामार्गामुळे रस्त्यावरती चिटपाखरू देखील दिसून येत नाही. मंत्रालयाशी संबंधित मंत्री, आमदार,मंत्रालयातील सरकारी बाबू,यांची नाईट लाईफला सेवा करणारे, कंत्राटदार तथा ठेकेदार, लॉक डाऊन झाल्याने, मुंबईला चारी बाजूनी विळखा घातलेल्या, समुद्रातील मंथन करणाऱ्या निरव शांत लाटेप्रमाणे, इथल्या मानवी जीवनातील, चक्र विभागातील नाईटलाइफ ची आर्थिक साखळी, थंडावली आहे.

मानवी मन आणि दळणवळण या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मानवी मनाची चक्रे ही 24तास फिरत असतात, तर दळणवळणाची चक्रे ही 24 तास सुरू असतात. यातील लोकांची परिस्थिती वगळता, श्रीमंताला दिवाळखोरीत नेणारा लोक डाऊन 2020 ठरू लागला आहे.

एका बाजूला वाढत जाणार दारिद्र्य, आर्थिक बेरोजगारी, गडद होत चाललेल्या मंदीचं सावट, मुंबईतल्या चंदेरी दुनिया चा झगमगाटाला देखील काळवंडनारे ठरत आहे. शहरे आणि उपनगरे ही बेचिराख झाल्याचे भासवत आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या सरकारी निमसरकारी खाजगी विमा कंपन्यांनी, तोंडावरती चुप्पी साधून ठेवली आहे. सरकारच्या घोषणा या सराईत गुन्हेगारांना नेहमीच पकडून आणल्या सारख्या, उपेक्षित ठरत आहेत. महाराष्ट्राच्या विरोधी पक्ष नेत्यांनी, केलेल्या अवास्तव मागण्या सरकारला , भारी पडताना दिसून येत आहेत. मुंबईची बंद पडल्या झालेली नाईट लाईफ सुरू कधी होणार? याकडे मुंबईसह चाकरमान्यांच, लक्ष लागून राहिला आहे.

छाया : समिक्षा फोटो, मुंबई.

8080532937

Updated : 1 Aug 2020 3:24 AM GMT
Next Story
Share it
Top