मीरकल गावातील रस्ते झाले चिखलमय
X
"मीरकल गावातील रस्ते झाले चिखलमय"
म मराठी न्यूज नेटवर्क
आशिष सुनतकर
उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
मो.७०३००८१०३७
गडचिरोली/अहेरी:- देशाला स्वातंत्र्य मिळूनही आज गडचिरोली जिल्ह्यातील अनेक गावे अतिदुर्गम भागात असल्याने गावाच्या विकासाची दिशा मिळाली नाही. त्यामुळे गावातील नागरिकांना नरकयातना भोगाव्या लागत आहे. हे मोठी 21 शतकातील शोकांतिका म्हणावी लागत आहे.
तालुका मुख्यालयापासून पंचवीस किलोमीटर दूर आलापल्ली व भामरागड मार्गाच्या "ग्लोरी ऑफ आलापल्ली" पासून दक्षिणेस मुख्य मार्गापासून गावामध्ये जंगलात तीन किलोमीटर अंतरावर आहे. या गावात जाण्यासाठी आजही पक्के रस्ता अभावी जंगल मार्गाने गावातील नागरिकांना जीवघेणा प्रवास करावे लागत आहे. सोबतच गावातील रस्ते देखील पाऊस आल्याने चिखलमय झाले असून, गावामध्ये प्रवेश करताना मोठी अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ग्रामपंचायत अंतर्गत मिरकल गावाचा समावेश आहे. या गावांमध्ये अजूनही विकासाची गंगा पोहोचली नसल्याने, गावकऱ्यांनी प्रत्यक्षात सांगत आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षित पणामुळे, आदिवासी समाजातील नागरिकांना 74 वर्षांनंतरही विकास व मूलभूत सोयी सुविधांपासून वंचित आहे.
मात्र गावातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याकरिता कोणत्याही अधिकारी त्या गावात विकास कामे करण्यासाठी पोहोचलेले नाही. गावात जाताना पक्क्या रस्त्याला रहदारी साठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. लोकप्रतिनिधींनी ग्रामस्थांच्या समस्या लक्षात घेऊन गावात विकासकामे करण्यात यावे अशी मागणी गावातील आदिवासी बांधव करीत आहेत.