Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > माहूर भारतीय जनता पक्षाची तालुका कार्यकारिणी घोषीत.

माहूर भारतीय जनता पक्षाची तालुका कार्यकारिणी घोषीत.

माहूर भारतीय जनता पक्षाची तालुका कार्यकारिणी घोषीत.
X

श्री क्षेत्रमाहूर /ता.प्र.पदमा गि-हे

जिल्ह्याचे खा.प्रतापराव पाटील चिखलीकर,जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगांवकर,आ.भीमराव केराम यांचे मार्गदर्शना नुसार भारतीय जनता पक्षाचे नेते तथा माहूरचे योगी शामबापु भारती महाराज यांचे अध्यक्षतेखाली व युवानेते अॅड.रमण जायभाये,तालुकाध्यक्ष अॅड.दिनेश येऊतकर,ज्येष्ठ नेते विजय आमले आणि माजी तालुकाध्यक्ष देवकुमार पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज दि.28 ऑगस्ट शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात संपन्न झालेल्या बैठकीत पक्षाची तालुका कार्यकारिणी घोषीत करण्यात आली.

घोषीत करण्यात आलेल्या तालुका कार्यकारिणी मध्ये निळकंठ कृष्णराव मस्के व अच्युत अशोक जोशी यांची तालुका सरचिटणीस,गजानन नागोराव डाखोरे,साहेबराव तुळशीराम जाधव,हरीश तुळशीराम मुंडे,संतोष नारायण सोनूले,पूरोषोत्तम किसनराव लांडगे, अनिता विनोद शिंदे,शीतल सचिन मूनगिनवार यांची उपाध्यक्षपदी तर विष्णु दत्तात्रेय पडलवार, विलास किसनराव चौधरी,संदीप गुणाजी राठोड,त्रिशूल माणिकराव पाटील,कैलाश सखाराम मोहर्ले,राजू श्रीराम जयस्वाल यांची चिटणीस पदी व किसनराव रामभाऊ गवळी यांची कोशाध्यक्ष, आनंदा श्रीराम हिंगाडे यांची प्रसिध्दी प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली.

आजच्या बैठकीत बंसगोपाल आग्रहारी,सुनील बोळे,संजय बनसोडे,बबन पोलूसवार,लक्षण ठाकूर,रामकिसन केंद्रे,अविनाश भोयर,आनंदराव कुडमेते,हर्षदीप दीक्षित,सोनू तोडसाम,रोहित मोहुर्ले,दिनेश गोडे,गणेश मांदाडे,गजानन मोहुर्ले व धीरज गुरनुले यांची उपस्थिती होती.बैठकीचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष अॅड.दिनेश येऊतकर यांनी केले.सूत्रसंचलन संजय पेंदोर व आभार प्रदर्शन प्रमोद सोनकर यांनी केले.

Updated : 8 Sep 2020 11:25 AM GMT
Next Story
Share it
Top