Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > माहूर तालुक्यात एकोणीस शेतकरी फळबाग योजनेचे लाभधारक.

माहूर तालुक्यात एकोणीस शेतकरी फळबाग योजनेचे लाभधारक.

माहूर तालुक्यात एकोणीस शेतकरी फळबाग योजनेचे लाभधारक.
X

श्री क्षेत्रमाहूर /ता.प्र.पदमा गि-हे

अर्ध्या अधिक माहूर तालुक्याला वळसा घालून पैनगंगा नदी वाहत असली तरी हा तालुका सिंचन क्षेत्रात अतिशय माघारलेला आहे.त्यामुळे काही शेतकऱ्यांनी स्वखर्चाने तर काहींनी शासनाच्या योजनेतून सिंचन विहिर करून आपली शेतजमीन ओलिताखाली आणली.त्यानंतर तालुका कृषी अधिकारी कार्यालयात फळबाग योजनेचा लाभ मिळविण्यासाठी अर्ज सादर केल्यावर 19 शेतकऱ्यांना मनरेगा अंतर्गत फळबाग योजनेचा लाभ देण्यात आला.

माहूर तालुक्यातील भोरड ( 2 ),मलकागुडा ( 5 ) पडसा ( 1 ), ,हरडफ(7 ),मुरली ( 1 ),लखमापूर (1 ),वाई बाजार ( 2 ) या गावातील एकूण 19 शेतकऱ्यांची सदर कार्यालयाने निवड करून मनरेगा अंतर्गत कुशल व अकुशल स्वरूपाच्या कामावर तेवीस लाख बावन हजार दोनशे एकविस रूपये खर्च करून त्यांना फळबाग योजनेचा लाभ दिला.

सदर योजनेचा लाभ जॉबकार्ड असलेल्या अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना देण्यात येतो.या वर्षी 106 शेतकऱ्यांनी अर्ज सादर केले असून 90 अर्ज मंजूर करण्यात आले असून 16 ला मान्यता मिळणे बाकी आहे.19 ची कामे सध्या प्रगतीपथावर असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी बालाजी मुंडे यांनी आमच्या प्रतिनिधीला दिली.

Updated : 10 Sep 2020 6:50 AM GMT
Next Story
Share it
Top