Home > विदर्भ > मालवाहक गाडीच्या धडकेने दुचाकी स्वार जागीच ठार तर  दुसरा  गंभीर 

मालवाहक गाडीच्या धडकेने दुचाकी स्वार जागीच ठार तर  दुसरा  गंभीर 

मालवाहक गाडीच्या धडकेने दुचाकी स्वार जागीच ठार तर  दुसरा  गंभीर 
X

म मराठी न्यूज टीम

मुर्तिजापुर तालुका प्रतिनिधी / अकोला :- भुषण महाजन दि. 16/11/2020

उड्डाणपूल दर्यापूर मार्गावर मालवाहतुक गाडीच्या धडकेने दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर झाल्याची घटना दिनांक 15 नोव्हेंबर रोजी साडेसातच्या दरम्यान घडली आहे. प्राप्त वृत्तानुसार रामहरी कुरूमकर वय 40 तसेच निरंजन चंदन वय 35 राहणार दुर्गवाडा मुर्तीजापुर हे दुचाकी एम.एच. 30 ए.जे. 5290 च्या क्रमांकाच्या गाडीने घरी जात होते यादरम्यान दर्यापूर मार्गावरील समोरुन येणारे मालवाहक क्रमांक टि.एस. 15 यु.डी. 1133 या दोघांची समोरासमोर जब्बर धडक झाली या धडकेत राम हरी कुरुमकर जागीच ठार झाले तर गंभीर अवस्थेत असलेले निरंजन चंदन यांना वंदे मातरम आपात्कालीन पथकाच्या मदतीने मुर्तीजापुर लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालय येथे उपचार करिता दाखल करण्यात आला परंतु प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अकोला येथे हलविण्यात आले या अपघातात मालवाहक चालविणारे चालक अमोल गवई यांना शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे पुढील तपास मुर्तीजापुर शहर पोलीस स्टेशन तर्फे करण्यात येत आहे.

Updated : 16 Nov 2020 2:56 PM GMT
Next Story
Share it
Top