मानापुरात 64 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा. म-मराठी न्यूज नेटवर्क
X
"मानापुरात 64 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा."
म-मराठी न्यूज नेटवर्क
दिवाकर भोयर/धानोरा प्रतिनिधी
मो.9421660623
गडचिरोली/आरमोरी :- 14 ऑक्टोबर 1956 साली सम्राट अशोक विजयादशमीच्या पावन पर्वावर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर लाखो अनुयायी सोबत बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. त्या दिवसाच्या स्मृतिप्रीत्यर्थ माना पुरात धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला.
यावर्षी कोरणा संकटाच्या पार्श्वभूमीवर बौद्ध बांधवांनी सोशल डिस्टंसिंगचे भान ठेवून अगदी साध्या पणाने हा कार्यक्रम पार पडला .बौद्ध समाज आणि महिला मंडळाच्या संपूर्ण पदाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने 64 धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा त्रिशला, पंचशील बुद्ध वंदना घेऊन प्रारंभ करण्यात आला. या सोहळ्याचे पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण सेवानिवृत्त प्राचार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण डि.के मेश्राम यांच्या हस्ते पार पडले. या प्रसंगी समाजाच्या अध्यक्षा सौ.नयना साखरे ,सचिव संदीप टेंभुर्णी, माजी अध्यक्ष भास्कर उंदीरवाडे, तंटामुक्त समिती अध्यक्ष घनश्याम साखरे ,ग्रामपंचायत समिती सदस्य तुकाराम वैरकर, मुख्याध्यापक कीचक सर ,जयराम हलामी तसेच बौद्ध समाजाचे सदस्यगण. महिला मंडळाचे पदाधिकारी व गावातील संपूर्ण बौद्ध बांधव या कार्यक्रमाला उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रा. संचालन धनपाल भैसारे यांनी केले तर चेतन ढवळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. ढवळे, साखरे, वालदे ,टेंभुर्णी यांनी मोलाचे सहकार्य केले....