माथार्जुन येथे महात्मा राजा रावन पूजनाचा कार्यक्रम,फलकाचे अनावरण संपन्न.
X
माथार्जुन येथे महात्मा राजा रावन पूजनाचा कार्यक्रम,फलकाचे अनावरण संपन्न.
म मराठी न्यूज टीम
प्रतिनिधी/ पुरुषोत्तम गेडाम
यवतमाळ / झरी जामणी:- दिनांक २५ ऑक्टोबर २०२० रोजी रविवार, माथार्जुन ता.झरी जिल्हा यवतमाळ येथे सम्राट महाराजा रावन पूजन करून यांच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. सदर कार्यक्रमात सगागण गोंड पंच कमेटी, कोलाम आदिम पंच कमेटी तसेच गावातील मान्यवर सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील व प्रतिष्ठित नागरिक इतर गावातील मंडळी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी संपूर्ण गावात उलगुलान रॅली काढण्यात आली. त्यानंतर सर्व गावकरी एकत्र गोळा होऊन गोंड पंच कमिटीच्या हस्ते सम्राट महाराजा रावण यांच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. या प्रसंगी महात्मा राजा रावण हे आमचे आदिवासी चे दैवत असून त्यांचे उच्चभ्रू लोकांकडून दहन करून समाजाला अपमानित करण्यात येते हे यापुढे थांबविण्यात यावे. राजा रावन याबाबत उपस्थितीतांना मार्गदर्शक करण्यात आले असून त्यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या शेवटी सगा गण यांनी आपल्या पूर्वजांना जपलं पाहिजेत, आपली संस्कृती आपण भावी पिढी ला सांभाळता आली पाहिजे असे मत व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
प्रतिनिधी :- पुरुषोत्तम गेडाम
मो.9763808163