Home > About Us... > “माझे कुटूंब-माझी जबाबदारी” मोहिमेचे 15 सप्‍टेंबराला प्राथमिक आरोग्य केंद्र विखरण येथे उद्घाटन

“माझे कुटूंब-माझी जबाबदारी” मोहिमेचे 15 सप्‍टेंबराला प्राथमिक आरोग्य केंद्र विखरण येथे उद्घाटन

“माझे कुटूंब-माझी जबाबदारी” मोहिमेचे 15 सप्‍टेंबराला प्राथमिक आरोग्य केंद्र विखरण येथे उद्घाटन
X

त-हाडी (प्रतिनिधी) दि. 15 :- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी राज्‍यात 15 सप्‍टेंबर पासून “माझे कुटूंब-माझी जबाबदारी” ही मोहिम धुळे जिल्‍ह्यामध्‍ये यशस्‍वीरित्‍या व प्रभावीपणे राबविण्‍यासाठी जिल्हा परिषदेमार्फत सुक्ष्‍म नियोजन करण्‍यात आले आहे. या मोहिमेचा प्रातिनिधीक शुभारंभ जिल्‍हा परिषद सदस्य भीमराव ईशी(त-हाडीगट) यांच्‍या हस्‍ते शिरपूर तालुक्यातील विखरण येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे 15 सप्टेंबर रोजी घेतला या कार्यक्रमाचे शुभारंभ केले . या कार्यक्रमासाठी , जिल्हा परिषद सदस्‍य भिमराव ईशी, पंचायत समिती सदस्य ममता चौधरी,, डॉ शशिकांत गुजर,सौ विनिता पाटील, राहुल पावरा, परिसरातील सर्व सरपंच तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. डॉ प्रसन्ना कुलकर्णी ,डॉ प्रतापसिंग पवार वैद्यकीय अधिकारी विखरण,डॉ हर्षवर्धन सोनवणे आरोग्य सहाय्यक प्रकाश वाघ, आशा पिंजारी एल एच व्ही ,आरोग्य सेविका आरोग्य सेवक, आशा कार्यकर्ती उपस्थित होते .

या मोहिमेसाठी गावानिहाय पथकांची स्‍थापना करण्‍यात येऊन दरदिवशी किमान 50 घरामधील व्‍यक्‍तींची चौकशी तसेच पल्‍स ऑक्‍सीमीटर व थर्मल गनच्‍या सहाय्याने तपासणी करण्‍याचे नियोजन करण्‍यात आले आहे. जिल्‍ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्‍यासाठी सहवासितांचा शोध व तपासण्‍या अधिक प्रमाणात करण्‍याबरोबरच अलगीकरणावर प्रशासनाने भर दिला आहे. “माझे कुटूंब-माझी जबाबदारी”ही मोहिमेत सर्व नागरीकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्रशासनाच्‍यावतीने करण्‍यात येत आहे.

Updated : 16 Sep 2020 6:14 PM GMT
Next Story
Share it
Top