Home > महाराष्ट्र राज्य > माझे कुटुंब माझी जबाबदारी, दुसऱ्या टप्प्यातील तपासणीला सुरूवात

माझे कुटुंब माझी जबाबदारी, दुसऱ्या टप्प्यातील तपासणीला सुरूवात

माझे कुटुंब माझी जबाबदारी, दुसऱ्या टप्प्यातील तपासणीला सुरूवात
X

माझे कुटुंब माझी जबाबदारी, दुसऱ्या टप्प्यातील तपासणीला सुरूवात

जिल्हयात मोहिमेचा पहिला टप्पा पुर्ण, केली 10.91 लक्ष नागरिकांची तपासणी

▪️2696 संभावित रूग्णांना शोधण्यात पथकाला आले यश.

▪️पैकी 2565 कोरोना चाचण्यात 249 जण बाधित आढळले.

प्रा,संतोष सुरपाम गडचिरोली जिला प्रतिनिधी 9420190877

गडचिरोली दि.19) : माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम राज्यासह जिल्हयात लोकसहभागातून राबविली जात आहे. गडचिरोली जिल्हयात एकुण लोकसंख्येपैकी 10,91,123 नागरिकांची तपासणी पुर्ण झाली. यात सारी, आयएलआय व ऑक्सीजन कमी असणारे संभावित 2696 जण आढळून आले. त्यातील 2565 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यातील 249 जण कोरोना बाधित असल्याचे आढळून आले. यामुळे या बाधितांना वेळेत उपचार व आरोग्य सेवा मिळाली आहे. यातून जिल्हयात कोरोना वाढीला व कोरोनामूळे होणा-या मृत्यूस ब्रेक मिळाला आहे. सद्या जिल्हयात कोरोना बाधित बरे होण्याचे प्रमाण 82 टक्के हून अधिक आहे याचे यश या मोहिमेचेच आहे असे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी म्हटले आहे. कोरोना बाधितांना शोधून त्यांना आवश्यक संदर्भ सेवा देणे हे या मोहिमेचे उद्दीष्ट आहे. लोकांमधील चूकीचे गैरसमज दूर होवून जिल्हयात लोकांकडून या मोहिमेला सहकार्य वाढत असल्याचे चित्र आहे. आता दुसऱ्या टप्प्यातील माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेला सुरूवात झाली आहे. आत्तापर्यंत दुसऱ्या टप्प्यात 1.90 लक्ष व्यक्तींची तपासणीही पुर्ण झाली आहे.

सर्वात जास्त कोरोना बाधित आढळले कोरची आणि धानोरा भागातील

माझेकुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेत गरजूंना वेळेत उपचार मिळावे म्हणून ग्रामीण भागात मोहिमेवर जास्त प्रमाणात लक्ष केंद्रित केले आहे. जिल्हयात 249 कोरोना रूग्ण या मोहिमेत आढळून आले. यामध्ये धानोरा (53) व कोरची (60) या दुर्गम भागात 113 बाधित रूग्ण मिळाले आहेत. तसेच 249 मधील उर्वरीत एटापल्ली 10, कुरखेडा 30, अहेरी 9, आरमोरी 15, चामोर्शी 17, गडचिरोली 5, मुलचेरा 2, सिरोंचा 12, वडसा 20 व वडसा शहरी भागात 16 जण आढळून आले आहेत.

तालुकानिहाय तपासणी करण्यात आलेल्या घरांची व कुटुंबातील सदस्यांची माहिती

अहेरी - 23618 (114682), आरमोरी -23173 (101730), भामरागड -7067 (35177), चामोर्शी - 39844 .(170052), धानोरा - 16782 (81646), एटापल्ली - 16214 (73064), गडचिरोली - 24541 (97023), कोरची- 8274 (45614), कुरखेडा -22171 (90034), मुलचेरा - 12352 (47909), सिरोंचा - 18088 (75710) व वडसा - 12918 (57362). तसेच शहरी भागात गोकुळनगर गडचिरोली - 17042 (69639) व वडसा शहरी- 7045 (31481) .

एकुण – 2,49,129 घरांमध्ये 10,91,123 नागरिकांची तपासणी पुर्ण.

या मोहिमेतील टप्पा 2 ला सुरूवात

माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेत पुढिल दुस-या टप्यातील सर्वेक्षण सुरू झाले आहे ते 24 ऑक्टोबरला संपेल. आत्तापर्यंत दुसऱ्या टप्प्यात 1,90,344 नागरिकांची तपासणी झाली आहे. या दुसऱ्या टप्प्यात पुर्वी राहिलेले नागरिक, नव्याने आजारी असलेले किंवा लक्षणे असलेले नागरिकांची तपासणी होणार आहे.

Updated : 20 Oct 2020 4:58 AM GMT
Next Story
Share it
Top