Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > माजी जि. प. अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांच्या हस्ते शिवभोजनचे शुभारंभ

माजी जि. प. अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांच्या हस्ते शिवभोजनचे शुभारंभ

माजी जि. प. अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांच्या हस्ते शिवभोजनचे शुभारंभ
X

माजी जि. प. अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांच्या हस्ते शिवभोजनचे शुभारंभ

आता अहेरीतील पटवारी भवन जवळ शिवभोजन मिळणार!

अहेरी:- संगम लोकसंचालीत साधन केंद्र अंतर्गत तेजस्विनी माय खानावळ " शिवभोजन"चे मंगळवार 20 ऑक्टोंबर रोजी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांच्या शुभहस्ते शुभारंभ करण्यात आले.

येथील उपजिल्हा रुग्णालयाजवळील पटवारी भवन जवळ शिवभोजन केंद्र उभारण्यात आले असून गरीब आणि गरजूंकरिता शिवभोजन थाळीचा सोय होणार आहे.

या प्रसंगी माजी जि. प.अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांनी, राज्यशासनाने शिवभोजन उपक्रम राज्यात राबवून गोर गरीब व कामगार मजुरांसाठी चांगली सोय उपलब्ध करून दिले असून ग्रामीण व खेड्यापाड्यातून तालुकास्थळी अवागमन करणाऱ्या नागरिकांसाठी शिवभोजन उपयुक्त ठरणार आहे असे म्हणत कोणीही उपाशी राहू नये हाच शासनाचा एकमेव उद्देश असल्याचे यावेळी आवर्जून सांगितले.

यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सारिका गडपल्लीवार, महसुलचे मंडळ अधिकारी एकनाथ चांदेकर, तलाठी कौसर खान पठाण, रा.काँ. चे श्रीनिवास विरगोनवार, अरुणा गेडाम व महिला बचत गटातील सदस्य उपस्थित होते.

स्वप्नील गोलेटिवार

अहेरी विशेष तालुका प्रतिनिधी

मो. ८३९०८७९१५२

Updated : 22 Oct 2020 1:17 PM GMT
Next Story
Share it
Top