- जिल्हा वार्षिक योजना 2021-22 च्या खर्चास जिल्हा नियोजन समितीची मान्यता
- मंगरुळपीर तालुक्यातील तऱ्हाळा येथील विचित्र अपघातात एक ठार
- उदयपूरला घडलेल्या घटनेचा मी निषेध करतो
- ब्रेकिंग न्यूज-: मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी अखेर दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा...
- यवतमाळ जिल्ह्यात 245 नवीन रेशन दुकान उघडणार
- गेल्या 24 तासात 23 नवीन कोरोना पॉझिटिव्ह
- नरसी चौक ते बस स्थानक बिलोली रोड परिसरात खाजगी वाहने बेशिस्त लावत असलेल्या वाहनेचा बंदोबस्त करावे : मुस्तफा पटेल कुंचेलीकर
- घुग्घुस येथे भाजपातर्फे कुलजारचे वाटप छोट्या व्यवसायिकांची प्रगती हिच देशाची प्रगती- भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे
- सिरोंचा वनविभाग जगंलो से सागवान की तस्करी कर रहे तस्करों पर वनविभाग द्वारा कारवाई..
- कृषी विभाग बियाणे कंपनीच्या दावणीला

मांसाहारी खवय्यांना लागले गटारीचे वेध
X
_जोड धंद्यातुन मिळतोय चांगला नफा_
त-हाडी प्रतिनिधी (महेंद्र खोंडे)
सध्या आषाढ (आखाड )महिन्याचा शेवटचा आठवडा शिल्लक राहिला असून येत्या सोमवारी 19 जुलै रोजी व 20 जुलै रोजी गटारी अमावस्या साजरी करण्यासाठी अनेक मासांहारी खवय्ये सज्ज झाले असताना बाजारात गावरान कोंबड्यां सोबतच कडकनाथ कोंबड्यांचा भाव देखील प्रचंड वधारला असल्याचे पहावयास मिळत आहे.
सध्या गावरान कोंबड्याला ४०० ते ५०० रुपये तर गावरान कोंबडीला ३०० ते ४०० रुपयांना विकले जात आहे. तर यापेक्षा जास्त बाजारभाव कडकनाथ जातीच्या कोंबड्याला व कोंबडीला मिळताना दिसतो आहे. साधारणतः १००० ते १५०० रुपये प्रति नगाला मोजावे लागतात. ग्रामीण भागात आखाड महिना म्हटलं की खास गावरान कोंबड्याला बांधावरच्या देवाला बळी देऊन आखाड पार्ट्या साजर्या केल्या जातात. शिवाय या देवांना गावरान कोंबड्यांचे काळीज नैवद्य म्हणून दाखवले जाते. तसेच त्यांना श्रीफळ, उदबत्ती व भात या पारंपारीक पदार्थासह गावरान कोंबडयाचे दोन्ही पाय व मुंडके सुद्धा नैवद्य म्हणून ठेवले जातात. त्यामुळे या महिन्यात गावरान कोंबड्यांच्या मागणीत वाढ झाल्यामुळे त्यांच्या बाजारभावात देखील वाढ झाल्याचे दिसत आहे.
सामिष खवय्यांसाठी तसा कोणताच महिना मांसाहारासाठी वर्ज्य नसतो. मात्र लवकरच श्रावण मास सुरू होणार म्हटल्यावर काही लोक एकदम दक्ष होतात. शिवाय ग्रामीण भागात श्रावण महिना पवित्र मानला जातो. त्यामुळे या वेळी मांसाहार केला जात नाही. आणि आखाडाचा शेवटच्या आठ दिवसांत मटण, चिकन, गावरान, गिरीराज व कडकनाथ कोंबड्यांना खूप मागणी वाढते. त्यामुळे खवय्ये लोकांचे पाय आपोआप शिरपुर तालुक्याच्या ग्रामीण भागातील त-हाडी, वरूळ, भटाणे, जवखेडा, अभानपुर, ममाणे, लोढरे, त-हाडकसबे, भामपुर या खेड्यांकडे वळतात.
गावरान कोंबड्यालाच अधिकची मागणी
या भागातील शेतकरी दुष्काळी पट्ट्यातील असल्याने जोडधंदा म्हणून गावरान,कडकनाथ व गिरीराज जातीच्या कोंबड्या पाळण्याचा व्यवसाय करतात. परिणामी या आखाड महिन्यात त्यांना सुगीचे दिवस आल्याचे दिसून येते. मात्र त्यासाठी या शेतकर्यांना एक ते दीड वर्ष त्या कोंबड्यांची काळजी घ्यावी लागते. विशेषतः जो कोंबडा आरवतो त्यांना देवासाठी विकत घेतले जाते. व या शिवाय उलटे पंख असणंऱ्या गावरान कोंबडा व कोंबडीला तर यापेक्षा अधिक प्रमाणात पैसे मोजावे लागतात. ही मागणी साधारणतः पौर्णिमेला सुरू होते व गटारी अमावस्ये पर्यंत कायम राहते.