Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > मांसाहारी खवय्यांना लागले गटारीचे वेध

मांसाहारी खवय्यांना लागले गटारीचे वेध

मांसाहारी खवय्यांना लागले गटारीचे वेध
X

_जोड धंद्यातुन मिळतोय चांगला नफा_जेष्ठ निरभिडे पत्रकार देवाधिदेव माहादेवराव घुगे यांचे प्रतिपादन

के.के.रिपोटर रिसोड

सध्या आषाढ (आखाड )महिन्याचा शेवटचा आठवडा शिल्लक राहिला असून येत्या सोमवारी 19 जुलै रोजी व 20 जुलै रोजी गटारी अमावस्या साजरी करण्यासाठी अनेक मासांहारी खवय्ये सज्ज झाले असताना बाजारात गावरान कोंबड्यां सोबतच कडकनाथ कोंबड्यांचा भाव देखील प्रचंड वधारला असल्याचे पहावयास मिळत आहे.

सध्या गावरान कोंबड्याला ४०० ते ५०० रुपये तर गावरान कोंबडीला ३०० ते ४०० रुपयांना विकले जात आहे. तर यापेक्षा जास्त बाजारभाव कडकनाथ जातीच्या कोंबड्याला व कोंबडीला मिळताना दिसतो आहे. साधारणतः १००० ते १५०० रुपये प्रति नगाला मोजावे लागतात. ग्रामीण भरजाहागिर या भागात आखाड महिना म्हटलं की खास गावरान कोंबड्याला बांधावरच्या देवाला बळी देऊन आखाड पार्ट्या साजर्या केल्या जातात. शिवाय या देवांना गावरान कोंबड्यांचे काळीज नैवद्य म्हणून दाखवले जाते. तसेच त्यांना श्रीफळ, उदबत्ती व भात या पारंपारीक पदार्थासह गावरान कोंबडयाचे दोन्ही पाय व मुंडके सुद्धा नैवद्य म्हणून ठेवले जातात. त्यामुळे या महिन्यात गावरान कोंबड्यांच्या मागणीत वाढ झाल्यामुळे त्यांच्या बाजारभावात देखील वाढ झाल्याचे दिसत आहे.

सामिष खवय्यांसाठी तसा कोणताच महिना मांसाहारासाठी वर्ज्य नसतो. मात्र लवकरच श्रावण मास सुरू होणार म्हटल्यावर काही लोक एकदम दक्ष होतात. शिवाय ग्रामीण भागात श्रावण महिना पवित्र मानला जातो. त्यामुळे या वेळी मांसाहार केला जात नाही. आणि आखाडाचा शेवटच्या आठ दिवसांत मटण, चिकन, गावरान, गिरीराज व कडकनाथ कोंबड्यांना खूप मागणी वाढते. त्यामुळे खवय्ये लोकांचे पाय आपोआप रिसोड तालुक्याच्या ग्रामीण भागाती भरजाहागिर या खेड्यांकडे वळतात.

गावरान कोंबड्यालाच अधिकची मागणी

या भागातील शेतकरी दुष्काळी पट्ट्यातील असल्याने जोडधंदा म्हणून गावरान,कडकनाथ व गिरीराज जातीच्या कोंबड्या पाळण्याचा व्यवसाय करतात. परिणामी या आखाड महिन्यात त्यांना सुगीचे दिवस आल्याचे दिसून येते. मात्र त्यासाठी या शेतकर्यांना एक ते दीड वर्ष त्या कोंबड्यांची काळजी घ्यावी लागते. विशेषतः जो कोंबडा आरवतो त्यांना देवासाठी विकत घेतले जाते. व या शिवाय उलटे पंख असणंऱ्या गावरान कोंबडा व कोंबडीला तर यापेक्षा अधिक प्रमाणात पैसे मोजावे लागतात. ही मागणी साधारणतः पौर्णिमेला सुरू होते व गटारी अमावस्ये पर्यंत कायम राहते.

Updated : 19 July 2020 12:01 PM GMT
Next Story
Share it
Top