Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > भिसी नगरपंचायतीचा मार्ग मोकळा -----* भिसी नगरपंचायतीची घोषणा

भिसी नगरपंचायतीचा मार्ग मोकळा -----* भिसी नगरपंचायतीची घोषणा

भिसी नगरपंचायतीचा मार्ग मोकळा  -----* भिसी नगरपंचायतीची घोषणा
X

आम,बंटी भांगडीया यांच्या प्रयत्नातून भिसी नगरपंचायत स्थापन करण्याचा मार्ग मोकळा


भिसी :-- अनिल रेवतकर प्रतिनिधी,


भिसी ::---१७ सदस्य असलेल्या भिसी अप्पर तहसील आता चिमुर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या प्रयत्नातून भिसी नगरपंचायत होण्याच्या मार्गावर आहे.

आम, बंटीभाऊ भांगडीया यांच्या प्रयत्नातून भिसी नगरपंचायत स्थापन करण्याच्या उद्देशाने मागील आठवड्यात शासणस्तरावर कार्यवाही अग्रेसित झाली होती, चंद्रपूर जिल्हाधिकारी यांनी भिसी नगरपंचायतीच्या अहवाल सविस्तरपणे सादर करण्याचे पत्र नगरविकास विभागाने १८ डिसेंबर २०२० रोजी काढले होते. त्यासंबंधी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी संबंधित विभागाचे अहवाल २२ डिसेंबर ला शासणस्तरावर सादर केले. राज्य शासनाने लगेच भिसी ग्रामपंचायतचे नगरपंचायत मध्ये रूपांतर करण्याचे आदेश काढून तशी उध्दघोषणा प्रसिद्ध करण्याचे आदेश महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग शासण निर्णय क्रं. एम यु एन २०१७/प्रत्र क्रं. २१/ नवि - १८, चौथा मजला मंत्रालय मुंबई ४०००३२ दि. २९ डिसेंबर २०२० नुसार शासकीय उद्घोषणा प्रसिद्ध करण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत .

८ डिसेंबर २०१९ ला चिमुर विधानसभा क्षेत्राचे आमदार किर्तिकुमार भांगडीया यांनी नगरविकास विभागाला भिसी ग्रामपंचायतचे नगरपंचायत मध्ये रूपांतर करण्यात यावे अशी मागणी केली होती. सतत पाठपुरावा करून एक वर्षाच्या आत भिसी ग्रामपंचायतीला नगरप़ंचायतचा दर्जा मिळवून दिला .

मागिल काही दशकांमध्ये काही राजकीय पुढाऱ्यांनी भिसी तालुक्याचे गाजर दाखविण्याचे काम केले.

परंतु आम,किर्तिकुमार भांगडीया यांनी अप्पर भिसी तालुका आणी नगरपंचायत बनवुन एकप्रकारे नविन वर्षाची भेटच भिसीवासियांना दिलेली आहे.

ग्रामपंचायतीच्या निवडणूका लागलेल्या असतांना भिसी येथील सर्वपक्षिय नेत्यांच्या कार्यकर्त्यानी आपले उमेदवारी अर्ज भरलेले आहे. नगरपंचायतला सर्वसंम्मती असेल तर सर्वपक्षिय भरलेल्या उमेदवारांनी आप- आपले नामांकन अर्ज मागे घेण्याशिवाय पर्याय नाही. इच्छाशक्ती असेल तर सर्व काही होऊ शकते . त्यामुळे सर्वपक्षिय राजकीय पक्षांच्या भुमिका काय असणार आहे,याकडे भिसीवांसियांच्या नजरा लागलेल्या आहे.


Updated : 30 Dec 2020 12:29 PM GMT
Next Story
Share it
Top