Home > महाराष्ट्र राज्य > घाटंजी येथे स्री अत्याचार विरोधात आंदोलन

घाटंजी येथे स्री अत्याचार विरोधात आंदोलन

घाटंजी येथे स्री अत्याचार विरोधात आंदोलन
X


घाटंजी (यवतमाळ) : भारतीय जनता युवा मोर्चा घाटंजी येथे महाविकासआघाडी विरोधात, आपल्या राज्यातील स्त्रियांवरील वाढत्या अत्याचाराचा जाहिर निषेध नेताजी सुभाषचंद्र बोस चौक घाटंजी येथे भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष व शहर अध्यक्ष व युवा मोर्चा तालुका अध्यक्ष व भाजयुमो शहर अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. नुकतच संभाजीनगर (औरंगाबाद) येथे राष्ट्रवादीचे महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष यांच्यावर नौकरीचे आमीष दाखवुन एका युवतीवर अज्ञात स्थळी नेऊन गाडीमध्ये अत्याचार व बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय, यावर राज्य सरकारने व पोलिसांनी त्वरीत कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली.

जर त्वरीत कडक कारवाई करून अटक नाही झाली तर युवा मोर्चातर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा ईशारा तालुका अध्यक्ष श्री.राजू शुक्ला व श्री.राहुल खांडरे श्री. विष्णूपंत नामप्पेलीवार श्री. भावेश सुचक यांनी दिला.यावेळी

तालुका सरचिटणीस, अशोक राठोड, शहर सरचिटणीस, मनोज हांमद, प्रविण चव्हाण,प्रणव वाघ, गजानन नव्हाते, सप्नील ऊपरिकर,हनुमान चौधरी,प्ननव गोहणे, राहुल मस्के,

गोपाल काळे, संयोजक भाजपा आर्णी विधानसभा व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

Updated : 30 Dec 2020 10:38 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top