महाराष्ट्र प्रभारी विजयसिंह राजू आणि प्रदेश उपाध्यक्ष कुणाल राऊत यांच्या उपस्थितीमध्ये युवक काँग्रेस ची आढावा बैठक संपन्न
X
मुर्तिजापूर तालुका प्रतिनिधी (भुषण महाजन) :- महाराष्ट्र प्रभारी विजयसिंह राजू आणी प्रदेश उपाध्यक्ष कुणाल राऊत यांचे उपस्थितीमध्ये महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस द्वारा पंचायत समिती मुर्तिजापूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत पंचायत समिती सभापती उर्मिला ताई डाबेराव, जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष बबनराव डाबेराव यांनी केले. प्रदेश सचिव निनाद मानकर यांचे स्वागत उपसभापती सुभाष राऊत यांनी केले. बैठकीमध्ये विजयसिंह राजू आणि कुणाल राऊत यांनी युवकांना रोजगार मिळणे बाबत संबोधित केले.
आढावा बैठकीला तालुकाध्यक्ष बाळासाहेब बाजड, विधानसभा अध्यक्ष मो शहबोद्दीन, पंचायत समिती सदस्य प्रकाश बोनगिरे, दादाराव किर्दक, देवाशिष भटकर, जिल्हा सेवादल सचिव रोहित सोळंके, जिल्हा युवक कॉंग्रेस सचिव तौसिफ खान, शहर कॉंग्रेस कमिटी शहर अध्यक्ष नितिन गायकवाड़, कामगार कॉंग्रेस शहर अध्यक्ष दीपक खंडारे, अनुसूचित जाती तालुकाध्यक्ष गौतम उमाळे, सोशल मीडिया शहर अध्यक्ष अमोल तातुरकर, फरहान शेख, मो दानिश, शोयब खान, मो रेहान, मो इरफान आदि कार्यकर्त उपस्थितीत होते.
भुषण महाजन मो.नं. – 9850024474 / 9156273113