महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन तर्फे वासीक ज़ुबेर शेख यांना कोव्हिड योद्धा गौरव सम्मान....
X
म-मराठी न्यूज नेटवर्क
विशेष प्रतिनिधी/ यवतमाळ
यवतमाळ, दि. 21 : 21 ऑक्टोबर 1959 रोजी जम्मू -काश्मिरच्या लडाख भागात केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानांवर अचानक चिनी सैनिकांनी हल्ला केला.यात प्रत्येक भारतीय जवानाने शौर्याने प्रतिकार करून देशासाठी बलिदान दिले.कर्तव्यावर असतांना 266 पोलिस जवान शहीद झाले, कर्तव्यावर असतांना शहीद झालेल्या पोलिस अधिकारी व कर्मचा-यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी 21 ऑक्टोबर हा दिवस पोलिस स्मृती दिन म्हणून पाळला जातो.याच स्मृती दिनाचे औचित्य साधून यवतमाळ येथील सामाजिक कार्यकर्ते व ज्येष्ठ पत्रकार श्री वासीक ज़ुबेर शेख यांना महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन यवतमाळ तर्फे कोव्हिड योद्धा गौरव 2020 सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
आज संपूर्ण देश कोरोण्यासारख्या महामारीने त्रस्त झालेला आहे। अशा या महामारी च्या काळात यवतमाळ शहरातील काही शूरवीर नागरिक,डॉक्टर्स,पोलीस आणि प्रसारमाध्यमातील पत्रकार बांधव आपल्या जिवाची पर्वा न करता यवतमाळ शहराचे नागरिकांची सेवा करीत आहे.असेच करोना योद्धा लोकांचे महाराष्ट्र पोलीस बॉईज असोशियन यवतमाळ च्या वतीने सन्मानपत्र देऊन समान करण्यात येत आहे.
देश कोरोना सारख्या महामारीने लढत आहे अशा वेळी आपल्या जिवाची पर्वा न करता यवतमाळ शहरातील नागरिकांना समर्पित सेवेबद्दल व दयनीय परिस्थितीत आपण केलेले समर्पण अस्वीकार्य आहे। व आपण सर्व सुपरहिरोसारखे लढा देत आहोत.आज संपुर्ण भारत एकजुट होऊन कोरोना महामारीशी लढत आहे.अशा कठीण परिस्थितीत आपण समाज आणि समाजातील लोकांसाठी करीत असलेले सेवाकार्य प्रशंसनीय आहे.आपल्या सेवेने सर्वांसमोर मानवतेचे एक नवीन उदाहरण ठेवले आहे. आपल्या धैर्याला आणि उर्मीला महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन (शाखा-यवतमाळ) सलाम करुन
तुम्हाला कोरोना योध्दा सन्मान पत्राने सन्मानित करित आहोत.
असे सन्मानपत्र देताना श्री अतीक हाजी शेख अफज़ल,अध्यक्ष पोलीस बॉईज असोशियन यवतमाळ यांनी व्यक्त केले.