Home > विदर्भ > महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी सुरु केलेल्या देशातील पहिल्या शाळेला राष्ट्रीय स्मारक घोषित करा

महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी सुरु केलेल्या देशातील पहिल्या शाळेला राष्ट्रीय स्मारक घोषित करा

महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी सुरु केलेल्या देशातील पहिल्या शाळेला राष्ट्रीय स्मारक घोषित करा
X

नांदगाव खंडेश्वर संघर्ष समितीचे तहसीलदार यांना निवेदन सादर

ज्ञानाची गंगा दारोदारी पोहचविल्या जावी व संपुर्ण समाजव्यवस्था शिक्षित व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून

क्रांती सूर्य ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी पुणे येथे सुरु केलेली देशातील पहिली मुलींची शाळा ही राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावी अशी मागणी सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारक संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

जानेवारी १८४८ साली महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी मुलीची पहिली शाळा काढली संपूर्ण आशिया खंडात पुणे येथील भिडेवाडा या ठिकाणी स्थापना झालेली पहिली मुलींची शाळा आहे. कुठलाही स्त्री पुरुष असा भेदभाव न राहता स्त्रियांना पुरुषांप्रमाणेच शिक्षण घेता या्वे यासाठी सावित्रीबाई फुलेनी भिडेवाडा येथून मुलीसाठी शिक्षणाची दारे खुले केली ज्या भिडेवाड्यातून स्त्री सक्षमीकरणासाठी पहिले पाऊल उचल्या गेले तो भिडेवाडा मात्र आज अत्यंत दयनीय अवस्थेत आहे. त्या करिता शासनाने भिडेवाडा हि जागा भुसंपादित करून त्या वास्तुस विकसित करून राष्ट्रीय स्मारक घोषित करावे अशी मागणी सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारक संघर्ष समितीचे तालूका समन्वयक तथा पत्रकार नंदकिशोर इंगळे यांच्या मार्गदर्शनात तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले.

यावेळी सुनील बनसोड, मनोज मानतकर, अरुणभाई शिंदे, गजानन राऊत, पदमाकर मेटकर,चंद्रकांत बळी, अक्षय मुळे याचे सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

मी मराठी न्युज

प्रतिनिधी नरेंद्र लांजेवार नांदगाव खंडेश्वर अमरावती

Updated : 8 Sep 2020 12:04 PM GMT
Next Story
Share it
Top