Home > महाराष्ट्र राज्य > महागाव ते सिंधी रस्त्याची दुरावस्ता

महागाव ते सिंधी रस्त्याची दुरावस्ता

महागाव ते सिंधी रस्त्याची दुरावस्ता
X

तालुका प्रतिनिधि

सुरज झोटिंग

मो.9284060820,9823436717

मारेगाव तहसील मधील मौजा महागाव ते सिंधी येथील गट ग्रामपच्यात रस्त्याचे अत्यंत दुरावस्था असल्यामुळे गावातील शेतकऱ्यांना शेती कसण्यासाठी शेतीचे अवजार वाहतूक करण्यासाठी जा येण्यास अत्यंत त्रास होत आहे, गावातील लोकांना महागाव ते सिंधी एक मेव रस्ता दोन (२) किलोमीटर चा असून, गावातील लोकांना आठा (८) किलोमीटर फिरत जाव लागते आणि तसेच सिंधी महागाव गट ग्रामपंचायत असल्यामुळे गावातील लोकांना ग्रामपंचायतच्या किरकोळ कामा करिता वारंवार जाणे येणे करावे लागत. असतात त्या रस्त्या अभावी पावसाळ्यात देखील अडचणीत अत्यंत त्रास सहन करावे लागते तसेच मौजा महागाव ता. मारेगाव येथील अनेक वयोवृद्ध व्यक्तींना निराधार अनुदानाचा लाभ मिळत नसल्याने त्यांची परिस्थिती फारच बिकट बनुन त्यांचे जगणे मुश्किल होत आहे .निराधार योजनेचा लाभ मिळावा म्हणुन हे वयोवृद्ध नागरिक आपल्या आयुष्याचा शेवटच्या टप्प्यात तहसिल कार्यालयात चकरा मारीत आहेत परंतु त्यांच्या कडे कोणीच लक्ष द्यायला तयार नसल्याने आपण या वयोवृद्ध नागरिकांच्या अडचणी सोडवून त्यांना तत्काळ निराधार योजनेचा लाभ द्यावा अशी मागणी अविनाश लांबट यांच्या पुढाकाराने निवेदन तहसीलदार साहेबांना मारेगाव यांना देण्यात आले यावेळी गावातील मुर्लीधर बलकी, गणेश खुसपुरे, भास्कर आत्राम, संजू तुरणकारसुभाष पिंपळशेंडे, पवन मिलमिले, मनोहर नेहारे, रमेश नेहारे,सुनंदा पिंपळशेंडे, संगीता वाघाडे, विमल आत्राम, सुनिता काकडे सोबत शेकडो ग्रामवासी उपस्थित होते

Updated : 3 Nov 2020 7:12 PM GMT
Next Story
Share it
Top