Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > महर्षी वाल्मिकी, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन

महर्षी वाल्मिकी, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन


टिम म मराठी न्युज नेटवर्क

प्रा. संतोष सुरपाम

गडचिरोली,(दि.01: भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आज पुण्यतिथी व भारताचे पहिले गृहमंत्री "लोहपुरुष"सरदार वल्लभभाई पटेल यांची आज जयंती तसेच महर्षी वाल्मिकी यांची जयंती आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेला अपर जिल्हाधिकारी अनंत वालस्कर यांनी माल्यार्पण करुन अभिवादन केले.

यावेळी नायब तहसिलदार के. एस. भांडारकर, जिल्हा नाझर, डी. ए. ठाकरे, श्री. कोल्हटकर, आदि. कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

उपस्थित सर्व कर्मचारी, अधिकारी वृंदानी श्रीमती इंदिरा गांधी व सरदार वल्लभभाई पटेल तसेच महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

तसेच यावेळी राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त सर्व उपस्थित अधिकारी/कर्मचाऱ्यांनी राष्ट्राची एकता, अखंडता व सुरक्षा अबाधित राखण्यासाठी शपथ घेतली.

Updated : 1 Nov 2020 1:58 PM GMT
Next Story
Share it
Top