Home > महाराष्ट्र राज्य > मराठा समाजाचा विश्‍वासघातः अ‍ॅड.विजय गव्हाणे

मराठा समाजाचा विश्‍वासघातः अ‍ॅड.विजय गव्हाणे

मराठा समाजाचा विश्‍वासघातः अ‍ॅड.विजय गव्हाणे
X

परभणी शांतीलाल शर्मा

मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात सुध्दा टिकावा यादृष्टीकोनातून या महाविकास आघाडी सरकारने कायदेशीररित्या व गांभीर्याने मांडणी न केल्याचा गंभीर आरोप भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठनेते माजी आ.विजय गव्हाणे यांनी केला.

मराठा समाज बांधवानी मोठ्या अथक प्रयत्नाने आरक्षणाकरिता एकत्रीतपणे संघर्ष केला, लढा उभारला. त्या गोष्टीचीच देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली तत्कालीन सरकारने गंभीर दखल घेतली.समाजातील निष्ठावान,अभ्यासू व्यक्तींना विश्‍वासात घेवून, कायदेशीरदृष्ट्या हे आरक्षण कसे टिकेल यादृष्टीने सर्वो्तोपरी निर्णय घेतले. परंतू मराठा समाजाच्या मुकमोर्चाना मुकामोर्चा असे संबोधन करणारे संजय राऊत, पुरोगामीपणाचा टेंबा मिरविणा-या राष्ट्रवादीच्या पुढा-यांकडून त्या संघर्षाची, त्या मोर्चाची टिंगलटवाळी करण्यात आली. याचं मंडळींनी समाजातील तरूणांकरिता तत्कालीन सरकारने स्थापन केलेल्या सारथी या संस्थेचे वाटोळे केले. याच मंडळींनी सर्वोच्च न्यायालयात हे आरक्षण टिकावे यादृष्टीकोनातून कायदेशीररित्या भक्कम असे बाजू मांडण्याचे गांभिर्याने प्रयत्नचं केले नाहीत,असा आरोप अ‍ॅड.गव्हाणे यांनी केला. या महाविकास आघाडीने याप्रकरणात नौटंकी सुरू केली आहे. नव्हे मराठा समाजाचा विश्वास घात केला आहे.त्यामुळे आता समाजबांधवांनी उषःकाल होता-होता काळरात्र झाली.... अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली .....या गिताप्रमाणे पेटून उठले पाहिजे, असे आवाहन अ‍ॅड.गव्हाणे यांनी केले.

Updated : 9 Sep 2020 5:28 PM GMT
Next Story
Share it
Top