Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > मराठा आरक्षणास स्थगितीने व्यथीतः सुरेश वरपूडकर

मराठा आरक्षणास स्थगितीने व्यथीतः सुरेश वरपूडकर

मराठा आरक्षणास स्थगितीने व्यथीतः सुरेश वरपूडकर
X

परभणी शांतीलाल शर्मा

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीस मा. सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी (दि.9) दिलेल्या स्थगिती आदेशाने आपण व्यथीत झालो आहोत, अशी प्रतिक्रिया जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष तथा माजीमंत्री आ.सुरेश वरपुडकर यांनी आमच्या प्रतिनिधीला दिली. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी समाज बांधवांनी मोठा संघर्ष केला, लढा उभारला. सरकारनेही भक्कम असा पाठपुरावा केला. कायदेशीरदृष्ट्या हे आरक्षण टिकावे यादृष्टीनेही भक्कम अशी मांडणी केली.परंतू मा.सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिलेल्या स्थगिती आदेशामुळे या प्रकरणात सर्वार्थाने विचारविनिमय,सर्वार्थाने सर्वस्तरावर अधिक गांभिर्याने प्रयत्न करावा लागेल.हे आरक्षण टिकेल, यादृष्टीने पुन्हा नव्याने सर्व कायदेशीरबाबी तपासाव्या लागतील, भक्कमपणे मांडाव्या लागतील,असे आ.वरपूडकर यांनी नमुद केले.

Updated : 9 Sep 2020 5:13 PM GMT
Next Story
Share it
Top