मंगरूळ मुगलमुक्ती योद्धा बाजीराव पेशवे
X
देवदत्त योद्धा पेशवा बाजीराव बल्लाळ हे मंगरूळला येऊन गेले......
असं कोणी तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल. परंतु हे संपूर्ण सत्य आहे. ते केवळ मंगरूळला येऊनच गेले नाही. तर मंगरूळला निजामाच्या तावडीतून सोडवून गेले होते.
मी अभ्यासाअंती ही माहिती नव्याने मांडतोय. चार दिवसापासून घरात आहे. अन आणि मेंदू पालखेडच्या लढाईच्या समरांगणात आहे.
दुसर्या महायुद्धात ज्या माणसाने हिटलर सारख्या प्रशासकाच्या एका मोठ्या जनरल रोमेलला युद्धात हरवले, त्या फील्ड मार्शल बर्नार्ड लॉ मॉंटगोमरी, सन १९६८ ला एक पुस्तक लिहीले आहे. A Concise history of Warfare. { प्रकाशन - विल्यम कॉलिन्स सन्स }
ह्या पुस्तकात त्याने जगातील महत्त्वाच्या लढायांचा आढावा घेतला आहे. या लढाईतील एक लढाई म्हणजे निजाम व पहिला बाजीराव यातील पालखेडची लढाई.
या लढाईत समरांगण हे महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश एवढं विस्तारले आहे. निजाम छत्रपती शाहू महाराजांच्या मुलुखात लूटमार करीत असताना. महाराजांनी बाजीराव पेशव्यांना दक्षिणेतून बोलावून घेतले. एव्हाना निजामाने 40 हजार सैन्य व 600 तोफांसह पहिले लोहगड, चिंचवड नंतर पाटस, लोणी पारगाव, सुभे, बारामती ही महाराजांची ठाणी उध्वस्त केली.
पेशवा बाजीराव हे केवळ 15 हजार घोडेस्वार घेऊन 27 ऑगस्ट 1727 ला साताऱ्याहून निघाले. थेट निजामाच्या मुलखात घुसले. पुढे मल्हारराव होळकर वर राणोजी शिंदे हे 25 हजाराचा सैन्य घेऊन बाजीरावांना भेटले. मराठवाड्याच्या सीमेवर धावजी सोमवंशी पाच हजाराचे सैन्य घेऊन पेशव्यांना भेटले. पुणतांबा ( ता.राहता जि.अहमदनगर ) वरून गोदावरी नदी ओलांडून जालना दिशेने सैन्य निघाले. जालना नंतर सिंदखेडच्या रक्षणार्थ आलेला ईवाज खानच्या सैन्याचा बाजीरावांनी धुव्वा उडविला.
"पुढे माहूर, #मंगरूळ, वाशीम ही निजामाची ठाणी पेशव्यांनी उधवस्त केली. निजामाला हे समजताच दख्खनेतून निजाम आपल्या मुलुखात परतला."
{ डिसेंबर - 1727, तारखेचा शोध सुरू आहे. }
पुढे कुकरगंडा ( जि.तापी, गुजरात ) जवळ तापी नदी ओलांडून पेशवांचे सैन्य जानेवारी 1728 ला गुजरात मध्ये शिरले. 25 फेब्रुवारी 1728 ला वैजापूर तालुक्यातील पालखेड येथे निजामाच्या सैन्याला गराडा घातला.पहिले पेशव्यांनी तहाची बोलणी नाकारली. नंतर 6 मार्च 1728 ला ऐतिहासिक मुंगी शेवगाव तह झाला. 17 कलमांवर एकमत झाले. तेव्हा बाजीराव पेशव्यांचे वय 28 वर्षे होते.
बाकी शेष..........
टीप :- शब्द मर्यादेत लिहितोय. आपल्या माहितीचे स्वागत आहे.ज्ञानसंपदेवर मक्तेदारी मी नाकारतो.त्यामुळे कोणीही माहितीचा वापर करू शकतो.
माहितीस्रोत:-
1} सौ.मेघा संगम-पार्डीकर यांचे निरीक्षण
2} गूगल / युट्युब
छाया -
1} A Concise history of Warfare व
2} त्यातील नकाशा
#sachin_kulkarni
9421745233
फुलचंद भगत
विदर्भ चिफ
मो.8459273206