Home > विदर्भ > मंगरूळपिर येथे चटणी भाकर आंदोलन,अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतिची मागणी

मंगरूळपिर येथे चटणी भाकर आंदोलन,अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतिची मागणी

मंगरूळपिर येथे चटणी भाकर आंदोलन,अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतिची मागणी
X

फुलचंद भगत/मंगरूळपिर

मंगरूळपिर येथे दि 19 रोजी दुपारी दोन वाजता संविधान मंच व समाज क्रांती आघाडीच्या वतीने शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी चटणी भाकर खाऊन आंदोलन करण्यात आले

निवेदनाचा आशय असा की अतिवृष्टी आणि कोविड 19 मुळे शेतकऱ्यांचे व गोरगरीब जनतेचे अतोनात हाल झाले तसेच लॉकडाऊनमुळे सर्वांची दयनीय अवस्था झाली आहे त्यामुळे दिवाळी साजरी कशी करावी हा यक्षप्रश्न निर्माण झाला आहे याशिवाय निवेदनात विविध मागण्यां केल्या असून ओला दुष्काळ जाहीर करावा,अतिवृष्टीमुळे झालेली नुकसान भरपाई दयावी यासह 8 मागण्या केल्या असून या निवेदनावर दयाराम इंगोले, गोपणारायन, देवानंद तिडके,वसंत मोरे, युनूस खान, शेंडे,देवराव डहाने,लक्ष्मणराव आढाखे, संतोष भगत, यासह अनेक कार्यकर्तेच्या स्वाक्षऱ्या आहेत

Updated : 19 Nov 2020 6:35 PM GMT
Next Story
Share it
Top