Home > विदर्भ > मंगरूळचा " सेतु " केवळ लुटण्याचा " हेतु "

मंगरूळचा " सेतु " केवळ लुटण्याचा " हेतु "

मंगरूळचा  सेतु  केवळ लुटण्याचा  हेतु
X

# गरजुंची लुट

# सेतु दिला भाड्याने

#एकाचे दोनदोन आधार कार्ड

#संचालकाची अरेरावी

#परवाना रद्द करा जनतेची मागणी

================

यवतमाळ: तालुक्यातील मंगरूळ (साखर कारखाना)येथे शासनमान्य सेतु सुविधा केंद्र आहे. परंतु मुळ परवाना धारकाने सदर सेतु केन्द्र भाड्याने दिले आहे. या सेतु मध्ये अनेक लोकाचे दोन दोन आधार कार्ड बनविले आहेत.

" विशाल " प्रमाणात अंध,अपंग, विधवा, परितकत्या, निराधार आणि शेतकरी, विद्यार्थ्यांना लुटले जात आहे. शासनाच्या फि व्यतिरिक्त अव्वाच्या सव्वा पैसे घेऊन भाडोञी सेतु संचालक जनतेची पिळवणूक करीत आहे. तो परगावी राहत असुन, मनात येईल तेव्हा सेतु उघडणे आणि मनात येईल तेव्हा बंद करणे असा मनमानी कारभार करीत आहे. असंख्य महत्वाचा कागदपञांवर मुळ सेतु संचालकाच्या सह्या मारत असल्याची माहिती आहे. या सेतु मध्ये मंगरूळ व्यतिरिक्त बेलोरा, वाई, साकुर, बोरी गोसावी, रामनगर, वसंतनगर, वडगाव, चांदापुर, भांब राजा, हिवरी, बेचखेडा, मनपुर, सह असंख्य गावातील नागरीक आपल्या कामासाठी येत असतात. माञ अनेकदा कार्यालयीन दिवशी सेतु बंद ठेवत असल्याने जनतेला नाहक ञास सहन करावा लागत आहे. सुरवाती पासुनच हे सेतु केंद्र जनतेचे खिसे खाली करुन,लाभार्थ्यांसोबत अरेरावी करण्यात तरबेज आहे. यवतमाळ तहसीलदार यांना माध्यमातून माहीती दिली आहे. जिल्हाधीकारी यांनी सदर सेतु केन्द्राची सखोल चौकशी करून ,परगावच्या व्यक्तीला भाड्याने दिलेल्या या सेतु केन्द्राचा परवाना कायमचा रद्द करावा. आणि एका व्यक्तीचे दोन दोन आधार कार्ड काढुन शासनाची आणि जनतेची फसवणूक करणार्या भाडोञी संचालकावर " विशाल "

प्रकारची कारवाई करण्यात यावी, असी मागणी मंगरूळ, बेलोरा, वाई,तरोडा, गणगाव, साकुर, भांब राजा हिवरी येथील नागरिकांनी केली आहे.

Updated : 9 Sep 2020 6:46 AM GMT
Next Story
Share it
Top