Home > विदर्भ > भेंडाला परिसरातील धान पिकाचे सर्वेक्षण करून राज्य सरकारने भरपाई द्यावी ! आमदार डॉ देवराव होळी

भेंडाला परिसरातील धान पिकाचे सर्वेक्षण करून राज्य सरकारने भरपाई द्यावी ! आमदार डॉ देवराव होळी

  1. आकाश विलास झाडे 9545023844

चामोर्शी - तालुक्यातील भेंडाला येथील शेकडो शेतकऱ्यांनी आज आमदार डॉ देवराव होळी यांच्या जनसंपर्क कार्यालयात सदिच्छा भेट दिली व या भागातील आपदग्रस्त शेतकऱ्यांची व्यथा मांडली , भेंडाला येथील भारतीय जनता पक्षाचे बूथ प्रमुख व नेते किशोर डांगे यांच्या नेतृत्वात आलेल्या गोरगरीब शेतकऱ्यांनी आमदार डॉ होळी व यावेळी उपस्थित जिल्हा परिषदेचे कृषी सभापती रमेश भाऊ बारसागडे यांच्या समोर गाऱ्ह्यानी व व्यथा मांडली ,व सांगितले भेंडाला हा भाग दिना पाटबंधारे विभागाच्या शेवटच्या टेलवर आहे व संपूर्णपणे सध्यातरी वरील पाण्याच्या भारोष्यावर आहे यावर्षी प्रामुख्याने मावा तुडतुडे फुलकिडे या रोगाने शेतातील पिके मोठ्या प्रमाणात नष्ट झाले आहे ,

या वेळी गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ होळी यांनी सदर विषयची गांभीर्याने दखल घेतली व आजच सदर मुद्दा

जिल्हाधिकारी गडचिरोली व कृषी मंत्रालय मुंबई येथे संपर्क साधून पुन्हा एकदा संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मागणी मांडली यावेळी प्रामुख्याने प्रमोद पोरेड्डीवार , रमेश धोटे , श्रीरंग महशाखेत्री ,गुरुदेव दांगे ,संजय सोनरके व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते ,

Updated : 30 Oct 2020 4:50 AM GMT
Next Story
Share it
Top