Home > विदर्भ > भारतीय संविधान दिनी संविधान प्रास्ताविक प्रतचे घरोघरी केले वितरण

भारतीय संविधान दिनी संविधान प्रास्ताविक प्रतचे घरोघरी केले वितरण

भारतीय संविधान दिनी संविधान प्रास्ताविक प्रतचे घरोघरी केले वितरण
X

भारतीय संविधान दिनी संविधान प्रास्ताविक प्रतचे घरोघरी केले वितरण

संविधान प्रास्ताविकाचे वाचन व्हावे हा उद्देश

युथनी घेतले पुढाकार!

आशिष सुनतकर

उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली

मो. 7030081037

अहेरी - 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिनी येथील युथनी पुढाकार घेऊन संविधान प्रास्ताविक प्रतचे घरोघरी वितरण केले.

कोरोनामुळे संविधान दिनाचे कार्यक्रम मोठ्या स्वरूपात घेता येत नव्हते तसेच संविधान दिनाचे महत्त्व टिकून राहावे आणि संविधान प्रास्ताविकाचे वाचन व्हावे यासाठी मोठ्या प्रमाणात झेरॉक्सचे प्रत काढून घरोघरी वितरित करण्यात आले.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक परिश्रम व कष्टातून भारतीय राज्यघटना तयार केली असून भारतीय संविधान भारतीयांसाठी वरदान ठरत असल्याने भारतीय संविधान दिनाचे महत्त्व टिकून राहावे व घरोघरी वाचन व्हावे यासाठी संविधान प्रास्ताविकाचे झेरॉक्स प्रत घरोघरी पोहचवून आणि सोबतच नजरेसमोर दिसण्यासाठी घराच्या भिंतीवरही चिकटविले.

सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अलोने, दीपक सूनतकर, महेश अलोने यांच्या मार्गदर्शनातून आशिष अलोने,राहुल गर्गम, प्रणय अलोने, नभीत ढोलगे, विनीत गोवर्धन, यश चांदेकर आदी युथनी परिश्रम घेतले.

Updated : 27 Nov 2020 7:48 AM GMT
Next Story
Share it
Top