Home > महाराष्ट्र राज्य > भातपीकाच्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर आमदार दौलत दरोडा यांची आढावा बैठक...

भातपीकाच्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर आमदार दौलत दरोडा यांची आढावा बैठक...

भातपीकाच्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर आमदार दौलत दरोडा यांची आढावा बैठक...
X

म मराठी न्यूज टीम

प्रतिनिधी/संजय लांडगे वाडा,पालघर

वाडा,(पालघर)दि.१७ : वाडा पूर्व भागात होणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या संभाव्य गारगाई धरण प्रकल्पात बाधित होणाऱ्या गावांचं पुनर्वसन प्रकल्प सुरु होण्याच्या आधीच करावं, तसेच प्रकल्पात बाधित होणाऱ्या गावांतील नागरिकांना त्यांची घरे, गावठाण तसेच शेतजमिनी व सर्व सोयी-सुविधा योग्य प्रकारे मिळाव्यात यासाठी तसेच परळी येथे मंजूर झालेले ग्रामीण रुग्णालय, गारगांव प्राथमिक आरोग्य केंद्र व आबिटघर आरोग्य उपकेंद्राच्या जागांचं हस्तांतर होऊन ही आरोग्य केंद्र लवकरात लवकर उभी रहावित तसेच परतीच्या पावसाने भातशेतीच्या झालेल्या नुकसानीचे लवकरात लवकर पंचनामे व्हावेत यासाठी आमदार दौलत दरोडा यांनी पुढाकार घेऊन दि. १६ ऑक्टोबर रोजी वाडा येथे आढावा बैठकीचे आयोजन केले होते.

या बैठकीला वाडा प्रांताधिकारी अर्चना कदम, तहसिलदार उद्धव कदम, मुंबई महानगर पालिकेचे अधिकारी तसेच जिल्हा शल्यचिकित्सक थोरात व भूमिअभिलेख, सार्वजनिक बांधकाम तसेच वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत गारगाई धरण प्रकल्पात बाधित होणाऱ्या गावांचे प्रतिनिधींनी उपस्थित राहून आपल्या समस्या व मागण्या आमदार दौलत दरोडा व अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. यावेळी प्रकल्पग्रस्तांच्या व शेतकऱ्यांच्या बाजूने राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे पालघर जिल्हा सरचिटणीस अशोक गव्हाळे, वाडा तालुका उपाध्यक्ष युवराज ठाकरे, वाडा शहर अध्यक्ष अमिन सेंदू, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष तारक जाधव, पंचायत समिती उपसभापती जगदीश पाटील, रोहिदास शेलार, ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष गणेश पाटील, सामाजिक कार्यकर्ते गणपत दोडे, ओगदे सरपंच भास्कर राथड, उपसरपंच देवराम दोडे यांनी चर्चेत सहभाग घेऊन प्रकल्पग्रस्तांना योग्य तो न्याय देण्याची मागणी केली.

यावर आमदार दौलत दरोडा यांनी मुंबई महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांना धरण क्षेत्राचा योग्य सर्व्हे करुन बाधितांच्या मागण्या शासन दरबारी मांडण्याच्या सुचना केल्या. तसेच परळी ग्रामीण रुग्णालय, गारगांव प्राथमिक आरोग्य केंद्र व आबिटघर आरोग्य उपकेंद्रांच्या जागा हस्तांतरणाबाबत व भातशेतीच्या नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर करण्यासाठी प्रांताधिकारी व तहसिलदार यांना सुचना देऊन ही सर्व आरोग्य केंद्र लवकरात लवकर सुरु होण्यासाठी व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.

Updated : 17 Oct 2020 4:59 PM GMT
Next Story
Share it
Top