Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > भाजपचे नेते अशोक जाधव यांचे निधन...

भाजपचे नेते अशोक जाधव यांचे निधन...

भाजपचे नेते अशोक जाधव यांचे निधन...
X

म-मराठी न्यूज नेटवर्क

वाडा,पालघर प्रतिनिधी / संजय लांडगे

वाडा,पालघर,दि.21 : तालुक्यातील डाकिवली येथील भाजपचे ज्येष्ठ नेते अशोक जाधव यांचे मंगळवारी दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे डाकिवली गावासह परिसरात शोककळा पसरली आहे.

अशोक जाधव यांचे व्यक्तिमत्व उत्तुंग होते.उत्कृष्ट वक्ता, अभ्यासु व्यक्तिमत्व व प्रशासनाचा त्यांना दांडगा अनुभव होता.ते तंटामुक्त गाव समिती डाकिवलीचे काही काळ अध्यक्ष होते.विशेष कार्यकारी अधिकारी पदही त्यांनी सांभाळले होते.त्यांचे अनेक सामाजिक, शैक्षणिक संस्थेशी निकटचे संबंध होते.गावाचा विकासात त्यांचे योगदान होते. त्यांच्या निधनामुळे डाकिवली गावासह परिसरात शोककळा पसरली असून त्यांच्या अकाली जाण्याने हळहळ व्यक्त होत आहे. एक लढवय्या योध्दा हरपल्याची प्रतिक्रिया भाजपने दिली आहे.

Updated : 21 Oct 2020 12:37 PM GMT
Next Story
Share it
Top