Home > महाराष्ट्र राज्य > बोंडअळी नुकसान भरपाई साठी धरणे आंदोलन

बोंडअळी नुकसान भरपाई साठी धरणे आंदोलन

बोंडअळी नुकसान भरपाई साठी धरणे आंदोलन
X

म मराठी न्यूज टीम

प्रतिनिधी :- पुरुषोत्तम गेडाम / यवतमाळ / झरी (जामणी)

या वर्षीच्या कोरोनाच्या महामारीत अखंड मेहनत घेत महत्वाची भूमिका बजविणारा आपला पोशिंदा शेतकरी. या वर्षीचा पावसाचा अंदाज घेता पर्जन्मान सरासरी पेक्षा खूप जास्त आहे, अश्या परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पिकांचं खूप नुकसान झालंय. सोयाबीन सारखं पीक तर शेतातून लढायचंच काम पडलं नाही जाग्यावरच कोंब फुटली. आता आशा होती फक्त कपाशी कडून. आमचा यवतमाळ जिल्हा सर्वाधिक कपाशीचे पीक घेणारा जिल्हा म्हणून ओळखलं जाते. दुष्काळात तेरावा महिना असं म्हटलं जात पण आज तर प्रत्यक्ष आमच्या घरीच तेरावा महिना आला आहे. अतिवृष्टी त्यातल्या त्यात पिकाला लावलेला साधा खर्चही निघाला नाही. अतीवृष्टी पाठोपाट कापुस उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्यास कारणीभूत असणाऱ्या बोंड अळीचा उद्रेक आपल्या जिल्हयात , तालुक्यात मोठया प्रमाणावर दिसतो आहे.

२०१७ साली डिसेंबर मध्ये आलेल्या या राक्षसी अळीमुळे शेतकऱ्यांना किमान काहीतरी कापुस झाला होता . मात्र यंदा ही अळी सप्टेंबरच्या पहिल्या आठवडयातच पातीत जाऊन बसल्याने आता सगळी बोंडे या अळीच्या भक्ष्य स्थानी पडल्याचे नागडे वास्तव्य शेतकयांची उरली सुरली आशा सुध्दा संपुष्टात आणणारे आहे . सगळया शेतकयानी बी.जी. - २ दानाची पेरणी केली आहे . आणि बियाणे कंपन्यांनी 90 दिवस बोंडअळी येणार नाही असा दावा केलेला असताना सुध्दा जर बोंडअळी ६० - ७० व्या दिवशी पात्याफुलात शिरते तर हा बियाणे कंपन्याचा दावा निरर्थक आणि शेतकऱ्यांना जमिनीत गाडणारा नाही काय? या निमित्याने भूमिपुत्र एल्गार संघर्ष समितीच्या वतीने यवतमाळ जिल्ह्यातील झरी जामनी येथे बोंडअळी नुकसान भरपाई हेक्टरी ४० हजार मिळावे यासाठी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व मंगेश पाचभाई यांनी केले आणि अनेक तालुक्यातील शेतकरी उपस्तीत होते

प्रतिनिधी :- पुरुषोत्तम गेडाम

मो.9763808163

Updated : 11 Nov 2020 1:48 PM GMT
Next Story
Share it
Top