Home > विदर्भ > बेरोजगारीवर केंद्र सरकारचे लक्ष केंद्रित करण्यासाठी रोजगार दो

बेरोजगारीवर केंद्र सरकारचे लक्ष केंद्रित करण्यासाठी रोजगार दो

बेरोजगारीवर केंद्र सरकारचे लक्ष केंद्रित करण्यासाठी रोजगार दो
X

राष्ट्रीय युवक कॉंग्रेसच्या वतीने उपविभागीय अधिकारी चिमुर यांना देण्यात आले निवेदन

प्रतिनीधी जावेद पठाण

चिमूर : - आज दिनांक 8 सप्टेंबर 2020 रोज मंगळवरला युवक काँग्रेस कमिटी चिमूर यांचे माध्यमातून बेरोजगारीवर केंद्र सरकरचे लक्ष केंद्रित करण्यासाठी रोजगार दो या राष्ट्रीय युवक काँग्रेसच्या अभियानांतर्गत उपविभागीय कार्यालय चिमूर, जिल्हा.चंद्रपूर यांना देण्यात आले निवेदन देशाची ढासळलेली अर्थव्यवस्था व कठीण परिस्थितीत बघता तसेच देशात वाढलेली उच्चशिक्षित तरुणांवर आलेली बेरोजगारी व या बेरोजगारीने संपूर्ण देशातील तरुणांचे होत असलेले हाल बघता व त्यांचे कुटुंबावर आलेली उपासमारीची वेळ लक्षात घेता निद्रावस्थेत असलेल्या मोदी सरकारचे म्हणजेच केंद्रशासनाचे लक्ष या समस्याकडे केंद्रित करण्यासाठी व देशातील बेरोजगारांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय युवक काँग्रेस यांनी शांततेच्या मार्गाने सरकारला जिल्हाधिकारी तसेच उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार यांचे मार्फत बेरोजगारीची दखल घेता काहीतरी उपाययोजना कराव्यात यासाठी शिस्तप्रिय पद्धतीने युवक काँग्रेस कमिटी चिमूर यांचे माध्यमातून उपविभागीय अधिकारी चिमूर श्री.संकल्प प्रकाश साहेब यांना निवेदन देण्यात आले.निवेदन देतांना प्रशांतभाऊ डवले, अध्यक्ष युवक काँग्रेस चिमूर, शुभम पारखी, सोशल मीडिया प्रमुख विधानसभा चिमूर,गौतम पाटील मंगेशजी रंदये,सहसचिव काँग्रेस कमिटी चिमूर, अमितजी मेश्राम, महासचिव युवक काँग्रेस कमिटी चिमूर, प्रज्वलजी पिसे,रोशनजी कुर्रेवार,आदी युवक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मंडळी उपस्थित होते.

Updated : 8 Sep 2020 7:56 PM GMT
Next Story
Share it
Top