Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > बावलगांवचे ग्रामसेवक ढगे यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप

बावलगांवचे ग्रामसेवक ढगे यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप

बावलगांवचे ग्रामसेवक ढगे यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप
X

(प्रतिनिधी)दि.३नोव्हेंबर

-----------------

तक्रारीच्या फेऱ्यात सापडलेले बावलगावचे ग्रामसेवक एस.एल.ढगे यांच्या विरोधात त्यांच्या कर्मा नुसार तक्रारी मागे तक्रार होत असल्याचे दिसून येत आहे.दि.२८ आँक्टोबर रोजी बावलगांवच्या सरपंचसह कांही सदस्यांनी सदर ग्राम पंचायतच्या कांही विकास कामामध्ये ग्रामसेवकानी मनमानी कारभार करून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे.या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून या ग्रामसेवका विरूद्ध कार्यवाही करण्यात यावी अशी लेखी तक्रार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे देण्यात आली आहे.

**तक्रारदारांनी तक्रारीत नमुद केल्या प्रमाणे सदर ग्रामसेवक आपल्या मनमानी कारभाराने कळस गाठला आहे.ग्रा.पं.च्या घेण्यात आलेल्या ठरावाची अमंलबजाणी न करणे,सरपंच व सदस्यांना विश्वासात न घेणे,माहे एप्रिल २०१८ ते सप्टेंबर २०२० मध्ये कर वसुली केलेली रक्कम बँकेत न भरता अपहार केला असून २०१८-१९ व २०१९-२०२० या कालखंडात चौदाव्या वित्त आयोगातुन केलेली कामे अंदाजपत्रका नुसार झालेली नाहीत यात भ्रष्टाचार झालेला आहे.याच प्रमाणे विशेष असे की चौदाव्या वित्त आयोगातुन केलेल्या कामाची जि.एस.टी.रक्कम ग्रामसेवकांनी शासकीय कोषागार कार्यालयात भरणे अवश्यक असतांना ती रक्कम न भरता रक्कमेची विल्हेवाट लावली आहे.गावातील कांही नागरीकांच्या मालमत्तेची नोंद ग्रा.पं.च्या दफ्तरी घेत असतांना प्रत्येका कडून २००० ते ५००० रु.वसूल केले आहेत.

असे गंभीर आरोप निवेदकांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे देण्यात आलेल्या निवेदनात केले , चौकशी करुन सर्व रक्कम वसुल ग्रामपंचायत फँडात जमा करावी.असेही निवेदनात स्पष्ट केले असून सदर ग्रामसेवकाची बदली झाली असतांना सुद्धा अद्याप कार्यमुक्त झाले नसल्याचे समजते आता वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यवाहीकडे लक्ष लागून आहे.

ए. जी. कुरेशी. बिलोली ता. प्रतिनीधी

Updated : 3 Nov 2020 7:20 PM GMT
Next Story
Share it
Top