Home > महाराष्ट्र राज्य > बांधावर खत योजना कागदावर

बांधावर खत योजना कागदावर

बांधावर खत योजना कागदावर
X

शेतकऱ्यांना खत मिळेना व पाऊस आला पण खत डोळ्याला दिसेना

महेंद्र खोंडे

त-हाडी ता.१० ( प्रतिनिधी) खरीप हंगामा करीता कृषी विभागाने मोठा गाजावाजा करीत शेतकरयांना कोरोनाच्या पार्श्वभुमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात बांधावर खत, बि-बियाणे देण्याचा निर्णय घेतला खरा परंतु अद्याप ही त-हाडी (ता.शिरपूर) सह परिसरातील गावातील असंख्य शेतकरयांना बांधावर खते मिळाली नसल्याचे चिञ मंडळात पहावयास मिळत आहे.

दरवर्षी प्रमाणे ग्रामीण भागातील शेतकरी खते व बि-बियाणे कृषि सेवा केंद्रावर खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. माञ यावर्षी संपुर्ण जगभरात कोरोनाने थैमान घातल्याने जगासमोर महामारीचे नवे संकट उभे राहिले आहे. आशातच जुन महिन्यामध्ये शेती मशागतीचे कामे सुरु असुन शेतकरयांची खते व बि-बियाणे खरीदीची लगबक सुरु झाली आहे. यामुळे बाजारपेठेत मोठी गर्दी उसळते. हि गर्दी होवु नये आणि कोरोना संसर्ग ग्रामीण भागात वाढु नये म्हणुन कृषि विभागाने थेट बांधावर शेतकरयांना सामुहिक गटामार्फत खते व बियाणे वाटप करण्याचा निर्णय घेतला असला तरी जवखेडा मंडळातील बहुसंख्य शेतकरी गटाला बांधावर खत वितरीत न करता मोजक्याच शेतकरयांना ते ही दुकानातुनच खते घेवुन जा असा प्रताप कृषि विभागाच्या कर्मचारयांनी त-हाडी . गावात केला आहे. अशा गंभीर प्रकार करुन कृषि विभागाने काय साध्य केले असा प्रश्न शेतकरयांना पडला आहे. अजुन अनेक शेतकरयांना बांधावर खते मिळाले नसल्याने कोणतेही शारिरीक अंतर न ठेवता ते कृषि सेवा केंद्रावरच गर्दी करीत आहे. यामुळे ग्रामीण भागात कोरोना संसर्ग वाढण्याची भिती नाकारता येत नाही. उंटावरुन शेळ्या हकलण्याचा प्रकार मंडळात कृषि विभागाच्या कर्मचारयांनी केल्याने बांधावर खत वाटप योजनेचा फज्जा उडाला आहे.

चौकट

कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता हि योजना सुरु करण्यात आली असुन कृषि विभागामार्फत जवखेडा मंडळात याची शेतकरयांमध्ये कोणत्याही प्रकारची जण जागृती करण्यात आलेली नाही. त्यामुळे बहुसंख्य शेतकरी बांधावर खत या योजनेच्या लाभा पासुन वंचित आहेत.

चौकट

या योजनेची माहिती मिळाली नसल्याने मी खते व बि-बियाणे कृषि सेवा केंद्रावर दिवसभर रांगेत उभे राहुन खरेदी केले आहे..

धनराज सतोष करके

(शेतकरी,त-हाडी)

चौकट

अजून शिरपूर तालुक्यात रॅक लागलेला नाही आहे एक दोन दिवसात लागल्यास शेतकऱ्यांना खत उपलब्ध करण्यात येणार व त्यांना खताचे वाटप करण्यात येईल..

श्री .पी टी पाटील (मंडळ कृषी अधिकारी त-हाडी)

Updated : 28 Jun 2020 3:49 PM GMT
Next Story
Share it
Top