बहुजनांच्या न्याय हक्कासाठी -ओ.बी.सी.समाजाने एकत्र येऊन संघर्ष करण्याची गरज.: ज्योतीबा खराटे
X
श्री क्षेत्रमाहुर/ता.प्र.पदमा गिर्हे
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा २८ वा वर्धापण दिन दि.1नोव्हें.रोजी शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख ज्योतीबा खराटे यांचे अध्यक्षतेखाली व सुभाष क्षीरसागर,नामदेव कातले,वसंत कपाटे,सुमित राठोड, समता परिषद यवतमाळचे जिल्हाध्यक्ष आत्माराम जाधव, अनिल रुणवाल,किशन राठोड,जिवन कोटरंगे,विलास मूनगिनवार,संतोष महल्ले या मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.या निमित्ताने बोलतांना ज्योतीबा खराटे यांनी बहुजनाच्या न्याय हक्कासाठी विखुरलेल्या ओबीसी समाजाने एकत्र येऊन संघर्ष करण्याची गरज व्यक्त केली.
अ.भा.महात्मा फुले समता परिषदेचे विभागीय अध्यक्ष मराठवाडा मकरंद सावे यांच्या मार्गदर्शनात जिल्हाध्यक्ष सुनील बेहेरे यांनी दि.१-- नोव्हें.रोजी पर्यटन विभागाच्या यात्री निवासच्या सभागृहात आयोजीत केलेल्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाचे उदघाटन सुभाष क्षीरसागर यांनी केले.यावेळी समता सैनिक,गुणवंत विद्यार्थी, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
पुढे बोलतांना खराटे म्हणाले की, विविध जाती धर्मात विखुरलेल्या बहुजन ओ.बि.सी.समाजावर होणारे अन्याय/ अत्याचार रोखण्यासाठी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शना खाली ना.छगन भुजबळ यांनी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची स्थापना केली.त्या माध्यमांतून तळागाळातील नागरिकांना त्यांचे हक्क मिळवून देण्याचे काम अविरतपणे सुरू असून राज्यासह देशात ५२ टक्के असलेल्या ओ.बि.सी. समाजाची जनगणना होत नसल्याची बाब खेदजनक असल्याचे सांगून विविध जातीत विखुरलेल्या 348 जातीनी पोट जाती विसरून आपल्या मुला बाळाच्या भविष्यासाठी व आपल्याला न्याय हक्कासाठी वज्रमुठ बांधावीच लागणार असून संघटन मजबूत नसल्यामुळे अर्थिक दृष्ट्या हा समाज मागासलाच राहीला अशी खंत त्यांनी व्यक्त केली. आपले संघटन मजबूत झाले नाही तर भविष्यात अठरा पगड जातीत विखुरलेल्या ओ.बी.सी.नां पारंपरिक धंद्या शिवाय पर्यायच उरणार नाही,त्यामु़ळे वेळीच विविध संघटनांनी एकोप्याने येऊन संघटन अधिक मजबूत करावे लागणार असल्याची गरजही खराटे यांनी व्यक्त केले.यावेळी आत्माराम जाधव व संतोष मह्ल्ले यांनीही मार्गदर्शन केले. याप्रसंगी अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील बेहेरे यांनी केले. सुत्र संचलन प्रा. गुरनूले सर तर
आभार प्रदर्शन सुरेश गिर्हे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निरधारी जाधव,अ.भा.माळी महासंघाचे कार्तिक बेहेरे,अ.भा.माळी महासंघाचे जि.अध्यक्ष सचिन बेहेरे,अ.भा.माळी महासंघाचे ता.अध्यक्ष बाळू ढगे ,अ.भा.माळी महासंघाचे ता.उपाध्यक्ष पवन मोरे,आनंद सोनूले,शिरीष बेहेरे,रवि बेहेरे,सूनिल बोळे,संदेश बेहेरे, सतिश भोपळे, संदीप गोरडे,रिक्की बेहेरे ,कूनाल बेहेरे,धिरज बेहेरे यांनी अथक परिश्रम घेतले.