बंद असलेले शकुंतला रेल्वे पटरीवर रस्त्यासाठी डांबरीकरण करण्याची मागणी
X
म मराठी न्यूज टीम
मुर्तिजापुर तालुका प्रतिनिधी / अकोला :- भुषण महाजन
मागील अनेक महिन्यांपासून बंद असलेले शकुंतला रेल्वे पटरीवर रस्त्यासाठी डांबरीकरण करण्याची मागणी नगराध्यक्ष द्वारकाप्रसाद दुबे यांनी केंद्रीय मंत्री खासदार संजय धोत्रे कडे निवेदनाद्वारे केली आहे. खा. धोत्रे यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की बंद असलेले शकुंतला रेल्वे गेटवरून वाहने मोठ्या प्रमाणात येणे-जाणे करतात. त्या ठिकाणी धोक्याचे मार्ग असून या रेल्वे गेटवरून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील सर्व वाहने येणे-जाणे करतात सध्या रेल्वे बंद असल्याने देखभाल सुद्धा बंद आहे. त्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रेल्वे पटरी च्या मधात खड्डे निर्माण झाले आहे. त्यामुळे अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून या ठिकाणी आवश्यक असलेल्या रुळावर डांबरीकरण करणे आवश्यक आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते आणि शकुंतला रेल्वे पटरी मधात असल्याने अनेक वाहनधारकांना त्रास होत आहे. कधी कधी तर याठिकाणी वाहनाचा जाम सुद्धा लागतो. म्हणून मुर्तीजापुर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर असलेल्या शकुंतला मार्गावर रेल्वे पटरीवर त्वरित दुरुस्ती करून डांबरीकरण चा रस्ता तयार करावा जेणेकरून अपघात टळणार व नागरिकांना होणाऱ्या त्रासापासून त्यांची मुक्तता होईल. याकरिता त्वरित उपाययोजना करावी अशी मागणी माजी नगराध्यक्ष द्वारकाप्रसाद दुबे यांनी केंद्रीय मंत्री खासदार धोत्रे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मुर्तिजापुर तालुका प्रतिनिधी / अकोला :- भुषण महाजन