प्रेषित (पैग़म्बर) मुहम्मद साहब यांच्या जयंती निमित्त आर्णी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन...
M Marathi News Network | 30 Oct 2020 1:29 PM GMT
X
X
म-मराठी न्यूज़ नेटवर्क
जाकीर हुसैन
- आर्णी : येथील मस्जिद खानकाहे नक्शबंद येथे दिनांक 30/10/2020 ला, ईद – ए – मिलादूनब्बी या प्रवित्र सनाच्या दिवशी, रक्तदान शिबिराचे आयोजित करण्यात आले. त्यात 70 लोकांनी रक्तदान करुन रक्तदान हेचश्रेष्ठ दान असल्याचे दाखवून दिले.या प्रसंगी हसनैन रजा, आरीफ शेख, अकरम दुंगे, शेख जाफर, जाकीर हुसैन सर्व मुस्लिम बांधव व त्याच बरोबर प्रामुख्याने आर्णी पोलिस स्टेशनचे ठाणेदार यशवंत बाविस्कर व माजी नगराध्यक्ष आरीज बेग आदि मान्यवर उपस्थित होते. तसेच रक्तसंक्रमन अधिकारी या चमू ने परिश्रम घेतले . मुस्लिम बांधवांनी सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबिर आयोजित केल्या बद्दल परिसरातील नागरिकांनी मुस्लिम बांधवांचे कौतुक केले. सध्या कोरोनाची साथ वाढत आहे त्यामुळे सर्व सणावर विरजण पडले आहे, लोक कोणताही सण साध्या पद्धतीने साजरा करत आहेत. म्हणूनच आर्णी येथील मुस्लिम बांधवांनी कोरोनाची परिस्तिथी लक्षात घेऊन सुरक्षित अंतर ठेवत “ईद इ मिलादुनब्बी” हा सण साजरा केला. जिल्ह्यात सध्या रक्ताची गरज खूप भासत आहे. तरी सदर उपक्रम स्तुत्य असल्याचे बोलल्या जाते.
Updated : 30 Oct 2020 1:29 PM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright M Marathi News Network. All Rights reserved.
Designed by Hocalwire