Home > महाराष्ट्र राज्य > प्राथमिक आरोग्य केंद्रात अनियमितता होत असल्याची तक्रार

प्राथमिक आरोग्य केंद्रात अनियमितता होत असल्याची तक्रार

प्राथमिक आरोग्य केंद्रात अनियमितता होत असल्याची तक्रार
X

फुलचंद भगत/मंगरुळपीर

कोरोना या संसर्गजन्य आजाराने जगामध्ये महामारी चे उग्र रूप धारण केल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य शासनाने नागरिकांच्या आरोग्याला अग्रक्रम देऊन मोठ्या प्रमाणात ग्रामीण आणि शहरी रुग्णालयांना निधीची तरतूद केलेली असताना अनेक आरोग्य केंद्रांमध्ये शासनाकडून पुरविण्यात येणाऱ्या निधीमध्ये अफरातफर होत असल्याची ओरड वरिष्ठांकडे तक्रारी करून करण्यात येत आहेत.

मानोरा शहर आणि तालुक्यातील आरोग्य यंत्रणा हे लोकप्रतिनिधीच्या सततच्या दुर्लक्षामुळे पूर्णपणे कोलमडलेली असून तालुका रुग्णालयांमध्ये कर्मचाऱ्यांचा वानवा, रुग्णवाहिकेची अनुपलब्धता, औषधोपचारांची कमतरता हे व इतर अनेक कारणांसाठी यापूर्वी अनेक वेळा उघडकीस आलेले आहे.

तालुक्यातील कुपटा ह्या गावी असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र द्वारे कुपटा भागातील अनेक गावांमधील नागरिकांचे आरोग्य अबाधित राखण्याचे काम करण्यासाठी दवाखान्याची निर्मिती करण्यात आलेली आहे. कुपटा ग्रामीण आरोग्य रुग्णालयातील मोठ्या प्रमाणात अनागोंदी असल्याचे लेखी निवेदन परिवर्तन शेतकरी संघटने द्वारा शासन आणि प्रशासनाकडे करण्यात आली असून कोविड-19 अंतर्गत शासनाकडून प्राप्त निधी मध्ये प्रचंड प्रमाणात अफरातफर करण्यात येऊन निकृष्ट दर्जाचे आरोग्यविषयक साहित्य खरेदी करणे, रुग्णवाहिकेची साठी अनावश्यक खर्च दाखवून निधीला कात्री लावण्याचे प्रकार झालेली असल्याने नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या कुपटा प्राथमिक रुग्णालयातील आरोग्य अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी शेतकरी परिवर्तन संघटनेच्या कडून राठोड यांनी केली आहे.

फुलचंद भगत,वाशिम

मो.8459273206

Updated : 20 Nov 2020 4:01 PM GMT
Next Story
Share it
Top