प्रसिध्द असलेल्या शुक्रवार आठवडी बाजाराला लागले अस्वच्छतेचे ग्रहण
X
मुर्तिजापुर शहर प्रतिनिधी / अकोला :- पंकज जामनिक दि. 19/11/2020
मुर्तिजापुर शहरामध्ये प्रसिध्द असलेल्या शुक्रवार रोजी भरणाऱ्या व शुक्रवारचा आठवडी बाजार म्हणून ओळख असलेल्या बाजाराला अस्वच्छतेचे ग्रहण लागले आहे. तेथे दुकान लावणाऱ्यांकरिता बनविण्यात आलेल्या ओटयांमधून एकाचे छत कोसळले आहे. तसेच या ओटयांची जागा छोटी असल्याने दुकान खालीच आपले दुकान थाटत होते. त्यामुळे कुठलीही अनुचित घटना घडली नाही. तसेच सध्या स्थितीमध्ये बाजरामध्ये करण्यात आलेल्या सौंदर्याकरणाला अस्वच्छतेने घेरले आहे. त्यातच भर पडलेली आहे. बाजारामध्ये आजू-बाजूच्या परिसरातील नागरिक बाजारातील स्वच्छतागृह व शौचालय पूर्णता: खराब झाल्यामुळे दुकान थाटणाऱ्यांकरिता असलेल्या जागेवर घाण करतात. या त्राच्या प्रमाणामध्ये अतोनात वाढ झाली असून नगर पालिका या समस्येकडे दुर्लक्ष करित असल्याचा आरोप दुकान थाटणाऱ्यांनी केला असून आम्हाला होणाऱ्या या त्रासापासून मुक्त करण्याची मागणी दुकानदारांनी केली आहे.
मुर्तिजापुर शहर प्रतिनिधी - पंकज जामनिक
मो.नं. - 8329313285