प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर योजना अंतर्गत नगर पंचायत चामोर्शी येथील फुटपाथ वरील विक्रेत्यांना प्रत्येकी दहा हजार रुपयांचे वाटप!
X
आकाश झाडे चामोर्शी तालुका प्रतिनिधी 9545023844
मोडकळीस आलेल्या सर्वसामान्य गोरगरीब फूटपाथ वरील छोटया व्यावसायिकांना मोठा दिलासा !
आमदार डॉ देवराव होळी यांचा पुढाकार !
- चामोर्शी -:नगर पंचायत अंतर्गत फूटपाथ विक्रेत्यांनी प्रधानमंत्री पथ विक्रेता आत्मनिर्भर योजना लाभ घेण्यासाठी अर्ज केलेल्या लाभार्थ्यांना बँक ऑफ इंडिया व बँक ऑफ महाराष्ट्र येथून गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ देवराव होळी यांच्या पुढाकाराने कर्ज मंजूर करण्यात आले आज या कर्जाचे वितरण गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ देवराव होळी यांच्या अध्यक्षतेखाली नगरपंचायत चे अध्यक्ष सौ, प्रज्ञा ताई उराडे , नगरपंचायत उपाध्यक्ष राहुल भाऊ नैताम, नगर पंचायत चे मुख्यअधिकारी आशीष चौधरी ,बँक ऑफ इंडिया व्यवस्थापक संजय कुमार,बँक ऑफ महाराष्ट्र व्यवस्थापक अभिनव चौधरी,भाजपा तालुका अध्यक्ष दिलीप चलाख उपस्थित होते उपस्थित होते.
आजच्या या नगर पंचायत सभागृहात करण्यात आलेल्या कर्ज वाटप कार्यक्रमात बँक ऑफ इंडियाच्या 24 लाभार्थी व बँक ऑफ महाराष्ट्र चे 14 लाभार्थी यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज मंजुरी चे पत्र व धनादेश उपस्थित आमदार डॉ होळी व मान्यवर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित लाभार्थी यांना आमदार डॉ होळी यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले या मिळालेल्या संधीचा फायदा घेऊन सर्वांनी आपले व्यवसाय मोडकळीस आलेले व्यवसाय पुन्हा सुरू करावे व सर्वांनी बँकेत आपले पत वाढवावे पुढे याच खात्यावर मोठे व्यवहार करून भविष्यात लाखो रुपयांचा कर्ज काढून मोठा उद्योग व्यवसाय उभारावा असे आव्हान केले.यावेळी नगर पंचायत चे नगराध्यक्षा सौ, प्रज्ञा ताई उराडे यांनी सुद्धा मार्गदर्शन केले या कार्यक्रमात चामोर्शी नगर पंचायत अंतर्गत अनेक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती या कर्ज वितरण कार्यक्रमाने मोडकळीस आलेल्या सर्वसामान्य छोट्या व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे ,या बद्दल सर्वांनी आमदार डॉ होळी व नगर अध्यक्षा सौ प्रज्ञा ताई उराडे यांचे स्थानिक फूटपाथ विक्रेत्यांनी आभार मानले,कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी नगर पंचायत मुख्याधिकारी व येथील कर्मचारी यांनी अथक प्रयत्न केले.