Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > पोलीस जवानाची गळफास लावून आत्महत्या

पोलीस जवानाची गळफास लावून आत्महत्या

पोलीस जवानाची गळफास लावून आत्महत्या
X

"पोलीस जवानाची गळफास लावून आत्महत्या"

आशिष सुनतकर

उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली

मो. ७०३००८१०३७

गडचिरोली/अहेरी:- प्राणहिता पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या पोलीस जवानाने इंदिरानगर बायपास रस्त्याजवडील तेल्ला गुट्टा पहाडीवर गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी 22 ऑक्टोबर सकाळच्या सुमारास उघडकीस आली. रणजीत राजूबापू गुडा (२८ रा. सिरोंचा जि. गडचिरोली) असे आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव आहे. अहेरी येथील नागरिक पहाटेच्या सुमारास इंदिरा नगर बायपास ते तेल्लागुट्टा या मार्गावर मॉर्निंग वॉकसाठी गेले असता, पोलिस जवान रणजीत गुडा यांचा मृतदेह गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी बजरंग देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रवीण डांगे, साहा. पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब शिंदे, पोलीस उपनिरीक्षक विनायक पाटील, महिला पोलीस उपनिरीक्षक आरती नरोटे, महिला पोलीस उपनिरीक्षक रूपाली काळे यांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला पोलिस जवान यांच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.

Updated : 24 Oct 2020 1:04 PM GMT
Next Story
Share it
Top