Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > पेरणी (अष्टाक्षरी )

पेरणी (अष्टाक्षरी )

पेरणी (अष्टाक्षरी )
X

प्रतिनिधी/देवेंद्र भोंडे

गेल्या साली गळ्यायहो

लय हानीचं सोसली

किस्तकाडी करूनही

नाई पयाटी पिकली.

इले म्या म्हणलं होत

अर्धी पयाटी वखरू

दिवू करडी टाकून

खात नाई व पाखरू.

बाई मोरं माणसाचं

चालतयं तरी काय

थोडं-थोडं करून ती

घर चालवत हाय.

अंदा केली मशागत

केलं वावर चिकन

चारी कोंटे चकाचक

नाई पेरता आटन.

वक्तावर बरसल

मिरगाचं हवा पाणी

कास्तकार नोता घेत

गोट कोणाचीचं कानी.

खात, बियाणं समद

घरी तयारचं होत

लागोलाग पेरणीचं

काम उरकून घेत.

पेरा करून घेतला

पाणी होतच चांगलं

दुबारून पेरणीन

गेल्या साली हो टांगल.

भुषण भेंडे. अमरावती

Updated : 13 Jun 2020 7:55 PM GMT
Next Story
Share it
Top