Home > महाराष्ट्र राज्य > पिंपळखुटी येथे क्रांतिकारी बिरसा मुंडा यांची १४५ जयंती कार्यक्रम आनंदाने पार पडला

पिंपळखुटी येथे क्रांतिकारी बिरसा मुंडा यांची १४५ जयंती कार्यक्रम आनंदाने पार पडला

पिंपळखुटी येथे क्रांतिकारी बिरसा मुंडा यांची १४५ जयंती कार्यक्रम आनंदाने पार पडला
X

म मराठी न्यूज टीम नेटवर्क

विशेष प्रतिनिधी अमोल सांगानी

राळेगाव यवतमाळ

राळेगाव तालुक्यातील पिंपळखुटी येथे दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी क्रांतिकारी बिरसा मुंडा यांची १४५ वी जयंती कार्यक्रम बिरसा मुंडा सभागृहात आयोजित केला होता जयंती कार्यक्रम ला उपस्थित मा.प्रशांत जी तायडे सभापती पंचायत समिती राळेगाव हे होते मुख्य मार्गदर्शक मा.मधुसुदन कोवे अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच हे होते तसेच प्रमुख अतिथी मा निरज जयस्वाल कार्यवाहक तिरुपती तिरुमाला मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी शाखा प्रबंधक यवतमाळ आणि नानाजी मोकडे मा गंगाधर जी घोटेकार उपस्थित होते आदिवासी समाजातिल लोकांमध्ये सामाजिक आणि आर्थिक विचार शिक्षण आणि सामाजिक एकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी क्रांतिकारी बिरसा मुंडा जयंती चे आयोजन केले जाते विदर्भ ट्राईबल परीषद चे तालुका शाखा प्रमुख मा देविदास जी उईके आणि सचिव मा दत्ताजी मरस्कोले यांच्या पुढाकाराने जयंती कार्यक्रम चे आयोजन केले जाते पिंपळखुटी गावात सर्व समाजातील लोकांचा सहभाग दिसुन येत होता मा मधुसुदन कोवे यांनी क्रांतिकारी बिरसा मुंडा यांची प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला तर मा प्रशांत जी तायडे सभापती राळेगाव यांना सप्तरंगी झेंडा चे ध्वजारोहन केले गावातील लोकांना क्रांतिकारी बिरसा मुंडा यांच्या कार्याला अनुसरुण उपस्थित मान्य वरानी मार्गदर्शन केले कार्यक्रम ला उपस्थित मा.प्रशांत जी तायडे सभापती पंचायत समिती राळेगाव मा मधुसुदन कोवे अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच मा निरज जयस्वाल कार्यवाहक तिरुपती तिरुमाला मल्टीस्टेट क्रेडिट शाखा प्रबंधक यवतमाळ मा गंगाधर घोटेकर आयोजक देविदास ऊईके शाखा प्रमुख विदर्भ ट्राईबल परीषद दत्ताजी मरस्कोले सचिव नितीन ठाकरे श्रीधर ढवस अरविंद पेंदोर नानाजी मोकडे बंडुजी पंधरे शेंडे जी रोहनकर जी राजाराम कोवे महीला बगीनी उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन दिनेश कोवे युवा अध्यक्ष विदर्भ ट्राईबल परीषद यानी केले क्रांतिकारी बिरसा मुंडा यांची १४५ वी जयंती आनंदाने पार पडली

Updated : 16 Nov 2020 3:16 PM GMT
Next Story
Share it
Top